Skip to main content

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/10/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : सुधीर काळेंचा हा थ्रेड - http://www.misalpav.com/node/14446 माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे आता करुनी मुर्खात गणना माझी त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ? पुरुषात रुपांतर करुनी झाले सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ? धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी रक्त सांडलेले तुझ्या पदरी ...
काव्यरस

भैरव गुनि गावत नित..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/10/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
या पूर्वी - सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..) सब सूर तीवर मेल मिलायो..(यमन) सकाळची वेळ.. भैरवाचं वातावरण.. भैरवाचं मनन, भैरवाचं चिंतन, भैरवाची भक्ति, भैरवाची शुचिर्भूतता..! राग भैरव.. आपल्या रागसंगीतातला एक बलाढ्य राग..

गहिवरल्या अधीर धारा ...

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/10/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ विचारांच्या किणार्‍यावरती आज लाटांची टोळ पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ सळसळणार्‍या भावनांचा घट्ट ओला पाचोळा क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ बावरलेल्या वार्‍यावरती स्वप्नांची झुले रेघ सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ --- शब्दमेघ

उद ग अम्बे उद ! उद !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 14/10/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवांनी त्यांच्या सेनेला दिलेलं पृथ्वीच राज्य. माझ्या घरी घट बसवला जायचा, अजूनही बसवला जातो. लहाणपणी ती कापसाची वळलेली नऊ मुठ वात, खास नवरात्रासाठी काढलेला लामण दिवा, या साऱ्याच फार अप्रूप वाटायचं. घटस्थापणे दिवशी संध्याकाळी देवघरात , (आम्ही देव खोली म्हणतो, ही एक छोटीशी देवांची खोली आहे) सारवलेल्या जमिनीवर पत्रावळ मांडली जायची. त्या पत्रावळीवर माती चा छोटासा ढीग रचला जायचा. त्या मातीत वेगवेगळी धान्य पेरून वर पाण्याचा मातीचा घट रोवायचा. ही घट स्थापना. मग वरच्या खुंटीला रोज एक झेंडूच्या फुलांची माला टांगून आज कितवी माळ हे ध्यानात ठेवायचं.

एका जेलियाने

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 14/10/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
डान्राव हे आमचे फार जुने मित्र आणि थोडे जुने राको (राकोचा अर्थ विचारण्यासाठी कृपया व्यनी आणि खरडी वापरू नयेत. तुम्हाला राकोचा अर्थ माहित असेल तर तुम्ही नशीबवान आणि माहित नसेल तर तुम्ही आनंदी (आठवा: अज्ञानात आनंद असतो)). डान्रावांच्या प्रदीर्घ कारकीर्दीवर 'एका जेलियाने' नामक पुस्तक लिहीण्याचा मानस आम्ही अनेकदा जाहिर केला आहे. आता प्रश्न असा पडेल की जेल या इंग्लिश शब्दाचा (खरंतर शब्दांचा gel आणि jail) इथे काय संबंध? तर संबंध आहे. डान्राव डोक्यास जेल (gel) लावतात आणि अनेकोत्तम सामाजिक कार्यांचा ध्यास घेऊन डान्राव जेलमधे जातात.

प्रगती!!! नक्की कशासाठी?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 14/10/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने प्रगती केली. आपला देश प्रगती करत आहे, जगाची फार प्रगती झाली आहे.... अनेक वाक्ये, अनेक लेख, वाद-विवाद, चर्चा, बातम्या, गप्पा बरंच काही. लहानपणापासुन बघतो, ऐकतो आहे, चालत आहे. पण मग ही प्रगती म्हणजे काय? आणि का? याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला, कदाचित जमला नाही. ;) बरं प्रगतीची व्यख्या करुयात.. माणसाला सुखी, समाधानी, ऐश्वर्य असेललं आयुष्य देऊ शकेल असे काहीतरी करण्याचा यशस्वी झालेला (?) प्रयत्न म्हणजे प्रगती असे म्हणुयात. मग भारत असो, पाकिस्तान , युरोप वा अमेरिका. ही प्रगती माणसं बदलु शकली का? माझ्या मते नाही. कितीही सुख, समाधान, ऐश्वर्य लाभलं तरी माणसं माणसंच.

बुक्का - कशाचा, कशासाठी?

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 14/10/2010 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
'गुलाल-बुक्का' वगैरेंमध्ये ज्याचा उल्लेख होतो त्या बुक्क्याविषयी काही मूलभूत प्रश्न आहेत. तत्पर उत्तरे मिळाल्यास मदत होईल.
  1. 'बुक्का' कशापासून बनवतात?
  2. धर्मकार्यांमध्ये त्याचे काही विशिष्ट स्थान असते काय? असल्यास ते कोणते?
  3. बुक्का काही प्रसंगी अशुभ मानला जातो का? असल्यास कोणत्या प्रसंगी? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  4. अंत्ययात्रेमध्ये प्रेताला बुक्का लावतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  5. चितेवर बुक्का टाकतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
मदतीबद्दल अग्रिम धन्यवाद.

चर्पटपंजरिका स्तोत्राचा भावानुवाद

लेखक राघव यांनी गुरुवार, 14/10/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः आदी शंकराचार्यविरचित चर्पटपंजरिका स्तोत्र खाली लिहिलेले आहे. जालावर बर्‍याच ठिकाणी पाठभेद दिसलेत. शेवटी माझ्याजवळील पुस्तकात होते त्याप्रमाणे लिहिलेले आहे. चु.भु.द्या.घ्या. द्वादशपंजरिका व चर्पटपंजरिका अशी दोन स्तोत्रं आहेत. मी केवळ चर्पटपंजरिका स्तोत्राचाच भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. हा भावानुवाद आहे, त्यामुळे मूळ गाभा कायम ठेवून अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय.
काव्यरस