Skip to main content

'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ!

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 26/09/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन अनेकांचे फोन, इमेल द्वारे एकच संदेश येत होता. ऑर्कुट उघडु नकोस. अकांउट हॅक होइल. (मिपामुळे तिकडे नसतोच मी). आज सकाळमधे सविस्तर बातमी आली आहे. 'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ! 'ऑर्कुट' या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर बॉम सबाडो नावाच्या 'बग'ने शनिवारी धुमाकूळ घातला. प्राथमिक माहितीनुसार हा 'बग' पासवर्ड हॅकर असून, तो संबंधित "ऑर्कुट'धारकाचे अकाऊंट हॅक करतो. 'ऑर्कुट'धारकांच्या स्क्रॅपबुकवर त्यांच्या मित्रगटातील व्यक्तीकडून 'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप येतो. इंटरनेट एक्‍सप्लोररमध्ये त्या स्क्रॅपवर क्‍लिक केल्यास एक्‍सप्लोरर हॅंग होते.

धक धक करने लगा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 26/09/2010 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी.

ग्लास पेंटिंग

लेखक सूड यांनी रविवार, 26/09/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासूनच रंग, ब्रश पाह्यले की हात शिवशिवतात. ते रंग, ब्रश घेऊन जोवर दोन-चार फटकारे मारत नाही कॅनव्हासवर, तोवर समाधान नाही होत. ग्लास पेंटिंग हे कधी केलेलं नाही पण शाळेत असताना आमच्या कलाशिक्षकांनी केलेले असे पेंटिंग्ज पाह्यलेत. आठवडाभरापूर्वी असेच काही ग्लास पेंटिंग्ज नजरेखालून गेले आणि मला चळ भरलं. असे पेंटिंग्ज आधी पाह्यले जरी असले तरी गुगलून अधिक अपडेट घेतले. पुन्हा रंग सॉल्व्हन्ट बेस्ड बरे का वॉटर बेस्ड हा प्रश्न आला. मग मिपाकरांची थोडी मदत घेतली.

अस्पृश्यतेचा कळस

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 25/09/2010 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यप्रदेशमधे एका राजपुत घराण्यातील कुत्र्याने,ज्याचे नाव शेरु आहे, एका दलित वस्तीत राहणा-या स्त्रीने घातलेली भाकरी खाल्ली.त्यानंतर घडलेल्या काही घटना : १.

स्मृतिभ्रंश!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 25/09/2010 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी खूप वाईट आहे. गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे. माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे! काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता.

पहावे अंतर्यामी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव भक्ताचा भुकेला वारकरी मेला वारीतच विश्वात्मक ऐसे इथे काही नाही तुच तुला पाही आत मध्ये तुझ्या अस्तित्वाचा एकच पुरावा मी पणा पहावा अंतर्यामी अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी सांडे अहंकार वासना विकार जेव्हा निर्विकार पाहसी तू...!!
काव्यरस