विडंबन परिपूर्ती करा
दिलेल्या ओळीची विडंबन परिपूर्ती त्याच मीटरमध्ये करा. तुमची ओळ हसू येणारी हवी, पण अश्लील नको.
परिपूर्तीसाठी ओळ आहे
राजसा जवळी जरा बसा
आता तुम्हाला त्यापुढे गेयता टिकेल असे दोन-तीन शब्दच टाकायचे आहेत. उदाहरणार्थ
राजसा जवळी जरा बसा, लाळ ती पुसा
किंवा
राजसा जवळी जरा बसा, रडा ढसढसा
(पुन्हा एकदा विनंती : अश्लील सूचक शब्द टाकू नयेत)
काव्यरस
मिसळपाव