जीवन एक महामार्ग
जीवनमार्ग असो वा वाहतूकमार्ग चढ आणि उतार ठरलेलेच. कधी कधी इतकी धोकादायक वळणे येतात की मनाला उत्तम ब्रेक असेल तरच कवटी शाबूत राहते. अन्यथा वाहनही बेकाबू होऊन सर्व सर्व ब्रेक अप होण्याचा संभव असतो.
अंधारी बोगदे पार केल्याशिवाय सुखाचा प्रकाश संभवत नाही.
कधी कधी तर इतका गुळमुळीत अन् मोकळा ढाकळा महामार्ग गवसतो की स्पीडचं थ्रिल अनुभवावंसं वाटतं. परंतु मध्येच येणाऱ्या ब्रेकरमुळे मनाला, तनाला अन् वाहनालाही वेसण बसल्याने थ्रिलचं किल मध्ये रुपांतर होत नाही. काही मार्ग निसरडे व ओलसर लागतात. अशाठिकाणी कोणताही सैलसरपणा अंगावर चमडी ठेवत नसतो. वळणदार घाटरस्त्याने झोकदार वळण घ्यायचे मनात घाटत असते.
मिसळपाव