Skip to main content

होईल कधी गे भेट ?

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 18/09/2010 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
होईल कधी गे भेट ? कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट ओझरते मी तुला पाहिले थार्‍यावरचे चित्त उडाले मनोरथांचे चढले इमले क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत ओठांवरती शब्द न येती मनात पण पाझरते प्रीति परतून जेव्हा पडेल गाठी नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत एकच आशा येशील गे तू जुळतील धागे जुळतील हेतू केव्हा होईल भेट परंतू अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

नासकवणी

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/09/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
नासकवणी आठवते का? :) खूप मस्त लागते. दूध नासवा ( पाव लिंबू पिळून); फार पिळू नका नाहीतर आंबट होईल. दूध फाटलं की घट्ट भाग खाली बसेल आणि पांचट वर ऊरेल तो घट्ट भाग वेगळा करा त्यात साखर घाला गॅसवर ऊलूसं हलवा कारण साखरेचा पाक होतो तो जावा म्हणून थंड किंवा गरम वाढा. नासकवणी हाझीर है|

कोनि आहे का ?

लेखक रवि यांनी शनिवार, 18/09/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो , आपल्यपैकी कोनी सध्या Lausanne , switzerland येथे राहत असेल ़तर जरुर कळवा. मी नुकताच येथे आलोय. कोनी मिपाकर येथे असतिल तर व्यनी करा किंवा येथे लिहा. धन्यवाद.

सामना व राहुल गांधी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 18/09/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्याविरुद्ध सामना या वर्तमानपत्रात असे लिहिले आहे * कश्मीर प्रश्‍नासंदर्भात ओमर यांना अधिक वेळ व मदत देण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. * पावट्याला पावटा मिळाला! अरे राहुल पावट्या, तुझ्या पणजोबांंनी म्हणजे पं. नेहरूंनी कश्मीरची वाट लावली.

गुड बाय !!!

लेखक अनुप्रिया यांनी शनिवार, 18/09/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी जाते आहे आता कायमची.... गुड बाय !! असं म्हणून मी बाहेर तर पडले पण मनात प्रश्न घोंघावतायत.... जायचं कुठे? करायचं काय? हे असं लपलपणा-या नजरांनी पहाणारं जगं जगू देईल? प्रश्नांची घोंघावती वादळं उत्तरांची चलबिचल.......

करडा आणि पांढरा

लेखक महानगरी यांनी शनिवार, 18/09/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षांपूर्वीचा हा अनुभव .... लिहावासा वाटला.. म्हणून लिहिला... सभोवार पसरलेले पांढरे शुभ्र बर्फ. कुठलाच रंग नसलेले आकाश आणि आसमंतात घुसणारे मत्त वार्‍याचे झोत. प्रत्यक्ष अनुभवताना काहीतरी अद्भुत आणि अगदी बिन ओळखीचे पाहते आहे असेच वाटत गेले. आभळातून हिमकणांची संततधार लागलेली. आधीच जमिनीवर मढलेल्या शुभ्र गालिच्यावर बर्फाचे पांढरे नाजुक थेंब पाहता पाहता मिटून जात होते. हिरवे गवत, काळी माती, नीळे आकाश, ह्या व्याख्याच ह्या हिमवादळाने उधळून लावल्या आहेत. आता रंग फक्त दोनच, एक जमिनीवर अच्छादिलेल्या सर्वव्यापी बर्फाचा पांढरा आणि दुसरा निष्पर्ण झाडाच्या बुंध्याचा करडा.

सिमेपलीकडची हाक

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 18/09/2010 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
बाल्टीमोरला नवीन घरात शिफ़्ट केले, तेव्हा मी जरा नाराजच होते. तिथे ह्युस्टन मधे चारी बाजुंनी ऐसपैस आवार, बगीचा, स्वत:चा स्मिमींग पूल ही ऐश. इथे अपार्टमेन्ट कॉप्लेक्स मधल्या एकावर एक रचलेल्या डब्ब्यांमधला एक डब्बा आपल्या वाट्याला आलेला. पण काय करणार! संकेतची नोकरी जिथे घेऊन जाईल, तिथे जाणे भागच होते. तरी दोन गोष्टी मनासारख्या होत्या. ह्युस्टनपेक्षा इथे जवळपासच्या भागात ओळखीपाळखी करून घेणे सोपे झाले. कारण आमच्या अपार्टमेन्ट कॉम्ल्पेक्समधेच बरेच इंडीयन होते. तिकडे होतो तेव्हा मला माझ्या अनुभवाला साजेसा जॉब काही मिळाला नाही. संकेत ऑफ़ीसमधे गेल्यावर येवढे मोठे घर जणू खायला उठायचे.

अजब रसायन

लेखक नि३ यांनी शनिवार, 18/09/2010 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
३० तारीख.पहीला पगार (आहाहा... स्वताच्या पायावर ऊभे झालो.. याच फिलींग वेगळच असते नाही ?) अकाऊंट मधे जमा झाला. घरापासुन मैलो दुर होतो कंपणीच्या ट्रेनींग ऑफीसात ...केरळ मधे... सगळे पहीले जण वालेच होतो ,सेलीब्रेट करायला बि-६ नावाच्या हॉटेल मधे जमा झालो . मि ही आपल्या नुकत्याच मित्र झालेल्या एका पंजाबी मित्राबरोबर आत गेलो. एक ढींच्याक तामीळ गाण्यावर सर्व जण नाचत होते.मि कोपर्यातला एक सोफा पकडला आणी त्यांचा नाच बघत होतो. माझा पंजाबी मित्र आल्या आल्या कुठे गेला ते कळ्ले नाही पण पाचच मिनिटात हातात दोन बियरच्या बाट्ल्या घेऊन आला. त्यातली एक त्याने माझ्या हातात दीली .

सर

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 18/09/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार........ विशेष नोंद : मी मिपावर इतर लेखांवर प्रतिसाद देत नाही व ह्यापुढे देणार नाही.पण मी लेख वाचतो,काही चांगले असतात्,आभ्यासु,वैचारीक,नवीन माहीती देणारे असतात.माझ्या एका लेखाच्या प्रतिसादात आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्यासारख्या फडतुस in turn थर्ड क्लास माणसाने एक भिकार लेख लिहावा व त्यावर आपल्यासरख्या प्रेमळ माणसांनी प्रतिसाद द्यावेत,ही गोष्ट माझी पातळी(पडलेली) उंचावल्याचा भास करुन देते. हो,फुकट आपुलकी मिळावी म्हणुन लिहल आहे,आपण खवमधे आपले विचार कळवावेत्,भीक आनंदाने स्विकारली जाईल.असो. आज माझ्या शाळेतल्या आवडत्या शिकक्षकाबद्दलचे व जुना आहे म्हणुन आवडायला लागलेल्या एका मित्रा