हेतु : सहज-गंमत-जम्मत ..कोणालाही दुखवण्याचा हेतु नाही.
" देखा है पहली बार साजन "....
कधी नव्हे ते ,माझ्या भ्रमणध्वनीवर, सदाशिव-पेठी, पर्याच्या फोन आलेला पाहुन,मी ,डॉन्याचा एकोळी प्रतिसाद बघुन जसा धम्या दचकतो,तसा दचकलो.फोन न घेण्यासारख दुसर काहीही कारण समोर न आल्याने मी फोन ऊचलला.तसेही आमच्या मोबाईलात ईनकमिंग फ्री असल्याने आम्ही सगळेच फोन उचलतो.(सध्या वोडाफोनच्या डायलर ट्युन्स प्रमोशनल कॉल्सनी झ्झीट्ट आणली आहे,ते देखील कन्नडात सुरु होतात, निव कर माडिद्रे का असल कायतरी ?). तर फोन ऊचलला (न घेऊन सांगतो कोणाला ? उद्या खरडवहीत " आर्थिक परिस्थितीने गाजुंन आपण आपला फोन गहाण ठेवला आहे काय?