या गोष्टी reciprocal नकोत का?
आज इंडियन एक्सप्रेसमध्ये खालील बातमी वाचली. या दुव्यावर सविस्तर वाचा.
http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/09/07/ArticleHtmls/07_09_20…
Govt may allow Pak judicial panel to visit, interrogate Kasab
अशा तडजोडी एकतर्फी नाहीं कां वाटत? अशी परवानगी आपण पाकिस्तानी judicial panelला दिली तर त्या बदल्यात आपल्या judicial panel ने पाकिस्तानात जाऊन भारतीय कैद्यांची चौकशी करायची मागणी का करू नये? उदा. आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां?
हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ?
आदर्श परिस्थितीमध्ये जनता कधीच सरकारला मोफत धान्य मागत नाही. केवळ ते धान्य गोदामामध्ये सडवान्यापेक्षा गरीबांमध्ये मोफत वाटप करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
प्रेम
"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं
एक जण आत्मविश्वासानी म्हणाली - "सोप्प आहे प्रेम अथांग समुद्रासारखं असतं. सर्व चूका पदरात घेणारं. परमेश्वराच्या कृपेसारखं"
दुसरी जरा अवखळ होती, म्हणाली "शुचि प्रेम मला झर्यासारखं वाटतं ग. येणार्या वाटसरूला निर्मळता बहाल करणारं, सदोदीत खळखळून वहाणारं."
ह्म्म .... माझं काही या उत्तरांनी समाधान झालं नाही.
पुढे काही मैत्रिणींनी देखील अशीच उत्तरं दिली - कडक उन्हात सावली देणार्या वृक्षासारखं परोपकारी तर कुणी म्हटलं शीतल चांदण्यासारखं.
मी ठरवलं व्यक्ती तितक्या प्रेमाच्या व्याख्या.
पण मग माझी प्रकृती कशी?
कोणीच ना पहाते...
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ?
ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा
जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा
संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा
माझे अबोलणेही भासे मला विषारी
कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा
आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला
माझा अनाम साथी असला सुना नकाशा
तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची
तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा
-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस
काळ नावाचं औषध......
लेख पुर्वी अन्यत्र प्रकाशित
-----------------------
लोक म्हणतात काळ हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. जात्या काळाबरोबर सगळ्याच जखमा हळूहळू भरून येतात म्हणे. होतं का बुवा खरंच असं?
११-१२ वर्षापुर्वीची गोष्ट, माझी एक मैत्रिण होती आणि ते म्हणतात ना कोणाच्या तरी प्रभावाखाली येणं तसं माझं झालं होतं. I was much too impressed with her!...तशा बाकीच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या पण ही माझी खूपच आवडती मैत्रिण होती. आणि ती माझ्या बाकीच्या कुठल्याच मैत्रिणींना आवडायची नाही.
मी पुरुष बिच्चारा
समान संधी मध्ये आजच्या
मी पुरुष बिच्चारा
बस मध्ये चढलो, अन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा
ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो
धक्का तीचा लागतो, पण
विनाकारण ' लाईनमन' होऊन
मार मला खावा लागतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा
वाटत अस्स उठाव अन
निवडून याव आपण
नियम समान करावेत
स्त्री पुरुषांसाठीचे, पण
नेमके तेंव्हा तिथले सीट
स्त्री साठी राखीव असते
काय करणार मी पुरुष बिच्चारा
नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून
लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले
फ़ॉर्म ही भरला, पण
नियमानेच गळा कापला
३० % लेडिज reserved म्हणून
आमचा नंबर waiting list ला गेला
काय करणार मी पुरुष बिच्चारा
त
काव्यरस
स्वप्नांचे पान मुंबई . . .
स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई
तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई
वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई
मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई
प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई
लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई
नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई
लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई
क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई
भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई
व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई
ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई
कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई
जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई
मराठीचे अस्तित्व येथे
एक जुनी कविता
प्रेम धर्म वाढवावा
मैत्री धर्म वाढवावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
गोमट्यास शिरि घ्यावे,
अभद्रास पायी तुडवावे
निर्भय प्रतिसाद द्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
नवीन विचार आणावेत,
जुने विचार तपासावे,
विज्ञानाचा ध्यास घ्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
कला दालने समृद्ध असावीत
कवितेंचि रेलचेल असावि
काथ्या कुट कुट कुटावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
मस्तवालावर चालुन जावे,
सताधुंदांना जेरीस आणावे,
लेखणीची समशेर करावि,
उत्तमाचा ध्यास घ्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
अविनाश
मिसळपाव