born insomniac....! झोप हविये झोप....!
झोप नाही येत यार!
sometimes i feel like i am born insomniac!
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
का होतं आहे असं!
बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही..
म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे?
स्पर्श
स्पर्श
वाटतं कधी कुणीतरी यावं नकळत पाठीमागून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या पाठीवरून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या केसातून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या डोक्यावरून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या चेहर्यावरून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन धरावा हात माझा आपल्या हातात
वाटतं कधी कुणीतरी यावं अन पहावं माझ्या खोलवर डोळ्यात
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा आपलेपणा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लळा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लडिवाळपणा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळाव्या थोड्या गुददुल्या
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावं
काव्यरस
पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा
श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा.
गोकाकचा धबधबा
गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........
मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे.
हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी...
धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा.....
धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग.......
धबधब्यावरील झुलता पुल....
धबधब्यावरील झुलता पुल....अंडाहार - शाकाहारी की मांसाहारी?
आधी कोंबडी की आधी अंडे, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेऊ. तसे आम्हाला दोन्ही आवडतात! प्ररंतु, सध्या आम्ही ग्रासलो आहोत तो एका वेगळ्याच प्रश्नाने. तो प्रश्न असा की, अंडाहाराची गणना शाकाहारात करावी की मांसाहारात?
आम्ही आमच्या एका प्रिय मित्राचा सल्ला घेतला. तो म्हणाला, "मांसाहारी".
म्हटले, "का?"
"हे बघ, अंडे येते कोंबडीच्या शरीरातून. कोंबडी तर मांसाहारी. सबब, अंडेदेखिल मांसाहारी", बिनतोड युक्तिवाद!
पण तसे आम्ही मूळचेच शंकेखोर.
त्याला विचारले, "ते बरोबर. पण मग दूधसुद्धा गायी-म्हशीच्या शरीरात्रूनच येते.
भयंकर षडयंत्र
डिस्क्लेमर : सदर कथा काल्पनिक असून त्याचे कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा.
*** वेळेअभावी संक्षिप्त स्वरुपात हे कथानक लिहितो आहे. ***
भयंकर षडयंत्र
उपोद्घातः
फेब्रुवारी १९९८
अफगणिस्थानातील तोराबोरा या दुर्गम इलाख्यातील एक प्रशस्त गुहा
आपल्या पॉश सोफ्यावर राजेशाही थाटात पाय पसरुन तो बसला होता. सोनी टीव्ही च्या आलिशान पडद्यावर तो अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्याक्षांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध कसे करते हे तो पहात होता. गेली कित्येक वर्षे तो हे करत होता.
विटेवर चा विटोबा
विटेवर चा विटोबा ,
हात टेवून कटीव र
उभा आपला युगान युगे ,
डोळे लावून वाटेव र
तो - काही येत नाही ,
हा - काही ट्ळत नाही
अरे कुणी सांगा त्याला
आजकाल आपल्या
पालकांचे पाय कुणी चेपतच नाही.
मिसळपाव