Skip to main content

सोमवारची कहाणी

लेखक जागु यांनी सोमवार, 16/08/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
कहाणी सोमवारची आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ? "खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण!

विकांताची खादाडी : राजस्थानी भेंडी आणी एक बोनस !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 16/08/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : वरील शिर्षकाचा आमचे मित्र 'भेन्डी बाजार' ऊर्फ 'प्रसन्न'चा काहीही संबध नाही,तसेच प्रसन्न आणी प्रसनदा ह्यांचाही अजुनतरी मिपासदस्य असण्याखेरीज काहीही संबध नाही. प्रेरणा : भेटली कधी तर माझा नमस्कार सांगा. साहित्य : कणेकरांचे आणी शिरवाळकरांचे...आपल हे ...सॉरी..भेंड्या. कढई पातेल बेसन पीठ तेल ई.ई.ई. कृती : सर्वात पहिले भेंड्या धुवुन घ्या. step 1 मग त्या कापा.चिरताना खाली दिलेल्या प्रमाणे कापायच्या आहेत.

पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?).

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी सोमवार, 16/08/2010 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे. भारतानेही काही लाखांची मदत देण्याची तयारी दाखविली आहे. आता जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी मदत दिली जात आहे,'' असा दावा "नवा-ए-वक्त' या पाकिस्तानातील ऊर्दू वर्तमानपत्राने केला आहे. पहा कुत्र्यांचे (शेपुट) वाकडे ते वाक डेच !॒! (आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम.

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 16/08/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कवी श्री. नारायण सुर्वे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.. एक वेगळं जग दाखवुन संवेदना जागवणारा निर्मळ कवी आणि सच्चा कार्यकर्ता हरपला.. मनःपुर्वक श्रद्धांजली.. आत्ता त्यांच्या कविता वाचाव्याश्या वाटतायत कुणी इथे त्या देउ शकेल का.

कलाकारी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 16/08/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकारी
विशाल मनाच्या कॅनव्हासवर मी शब्दांचे चार फटकारे मारतो हळुहळु शिल्प तयार होते अन वेडी लोकं म्हणतात "व्वा! छान कविता करतो!"
काव्यरस

व्यथा

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 16/08/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगू अंधकारा या चिरागाची व्यथा? काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? ही मिजाशी आज कोत्या काजव्यां व्हावी कशी? पौर्णिमेला ग्रासलेल्या चंद्रम्याची ही व्यथा मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी काय सांगू या गजांना अंतरीची ही व्यथा राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती, रक्तरंजी भर्जरी या क्रांतिवस्त्राची व्यथा? बोलणेही खुंटले जेव्हा मला फर्मावले कर्णदोषी, मूक लोकां सांग जा तूझी व्यथा ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा?
काव्यरस

घनश्याम सुंदरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/08/2010 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नेहमी कसा नवीन तजेला घेऊन येते! रात्रीचा अंधार कालच्या सगळ्या विवंचना, दु:खे घेऊन दूर पळून गेलेला असतो. त्या काळज्यांच्या सावल्या भले नंतर पुन्हा येवोत. पण उन्हाबरोबर परत येऊन त्यांनी मनाला अजून तरी झाकोळून टाकलेले नसते. तेव्हा हा वेळ चोवीस तासांमधला एकदम टवटवीत आणि बिनधास्त वेळ असतो. जो काही उद्योग आपण ह्या प्राईम टाईम मधे करू, त्यात प्रचंड सुख मिळते. कारण सुखाला अधूनमधून छेद देणाऱ्या कटकटींचे तात्पुरते का होईना, पहाटेच्या वेळेत विस्मरण झालेले असते.

जर........तर मग खुशाल जाऊद्या एखाद्या कुटुंबाला मतदानादिवशी हवे तिथे पिकनिक साजरि करायला. काय हरकत आहे ?

लेखक गांधीवादी यांनी सोमवार, 16/08/2010 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
विजू भाऊंच्या ह्या प्रतिसादावरून सुचलेले हे लेखन http://mr.upakram.org/node/2741#comment-44212 इथे विजू भाऊंनी एक विधान केलेले आहे कि, >> मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का? ह्यांचा आक्षेप कदाचित असा असेल कि सर्वसाधारण माणूस मतदानादिवशी पिकनिक साजरि करायला जातो. जो जातो त्यास राजकीय नेत्यांना काहीही बोलण्याचा अधिकार रहात नाही. ह्याच्याशी पूर्ण पणे सहमिती दर्शविल्यानंतर मात्र खालील विचार मनात आले, मागल्या निवडणुकीत जवळपास ६० % मतदान झालेले होते.

एच आर, प्रोसेस आणि मी

लेखक शुचि यांनी सोमवार, 16/08/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
कॉसकोची वारी म्हणजे तशी म्हतली तर चंगळच असते. भरपूर रंगीबेरंगी गर्दी, हिरव्यागार भाज्या, रसरशीत फळं, मासे , चिकन, पोर्क सगळं मस्त हाताळायला मिळतं ते मिलतं वर नमुनेदेखील चापायला मिळतात. आमच्याकडे साधारण १५वड्याचं, महीनाभराचं सामान या वारीत आणलं जातं. पण दिवाळीनंतर येतो शिमगा त्या न्यायाने कॉसकोच्या फेरीनंतर घरी आल्यावार एक-एक करत ते सामान गाडीतून उतरवायचं, नंतर जीना चढत चढत दारापर्यंत न्यायचं, तिथून पुढे फ्रीजपर्यंत नेऊन लावायचं म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. ४-४ गॅलन दूध, अंडी,फळांचे भाजांचे टोप, मासे, चिकन, चिकन ब्रॉथ चे कॅन्स, केचप्स, सिरीअल्स एक ना दोन.

पीपली लाइव - विरोध

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 16/08/2010 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........
विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स