हे म्हणजे कै च्या कैच
तुम्ही लोकांनी पार वैताग आणला आहे राव. हो तुम्हीच! अरे इथे मिसळपाववर छळता ते पुरे नाही का? सुखाने जगु द्या की एखाद्याला...
असे दचकु नका, आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात आलेले प्रामाणिक विचार वर लिहले आहेत. खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत, अन तुम्ही दचकला तसेच मला दचकवुन उठवण्यास कारणीभुतही हेच विचार.
तर झाले आहे काय, तुम्ही लोक (जसे कोणाही एका मिपा कराला इथे सतत छळता तसेच) मला ही छळत आहात, पण माझ्या स्वप्नात. हसु नका! प्रकरण गंभीर आहे. अहो झोपेचं पार खोबरं झालंय हो. आजचच उदाहरण घ्यायचं तर मला चक्क संपादक मंडळाचा व्यनी आला हो!
मिसळपाव
स्व. रफी साहेबांना प्रणाम!
ऐकूया त्यांचे आजरामर गाणे.