भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात
रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो.
भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच.
मिसळपाव