लोकसत्ता मधील हा लेख मिळेल का कोणाकडे?
नमस्कार मिपाकरांनो :H :-H :wave:,
माझे, माझ्या मित्रांसोबत, 'हिंदी ही राष्ट्र भाषा आहे की नाही' यावरून वाद चालू आहेत. हिंदी राष्ट्रभाषा नाही असे माझे म्हणणे आहे. मात्र माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे काही नाही. त्यामुळे हिरीरीने मत मांडता येत नाहीये.
मला आठवतेय की लोकसत्तेत काही महिन्यांपूर्वी (साधारणतः त्या अबू आझमीचे शपथविधी प्रकरण घडले त्यावेळी) सदर लेख आला होता ज्यात "हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून कुठेही उल्लेख नाही" असा मुद्दा फार व्यवस्थित मांडला होता. दुर्दैवाने मला लेखाचे आणि लेखकाचे नाव आठवत नाहीये. लेखक बहुदा सुनील चावके असावेत.
मिसळपाव