Skip to main content

गिरवी कशी बनवायची

लेखक वाघा यांनी शुक्रवार, 12/03/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वदिस्ट भाजी बनवन्यासाठी लागणारी गिरवी कशी बनवायची कोणी सागेल का

अभिनंदन आणि हाबिनंदण

लेखक प्रदीप यांनी शुक्रवार, 12/03/2010 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदन--- निर्धाराने पाठपुरावा करून २००२ सालच्या 'बाली बाँबिंग'मागील प्रमुख सूत्रधार दुलामतिन ह्या दहशतवाद्याचा शेवट केल्याबद्दद्ल इंडोनेशियन सरकारचे. गेल्या काही वर्षात हे सरकार दहशतवादाविरूद्ध अत्यंत निर्धाराने खंबीर पाऊले उचलत आलेले आहे. हाबिनंदण-- आपल्या खंबीर सरकारचे. अलिकडे नक्शलवाद्यांनी केलेल्या (आणखी) एका हल्ल्यानंतर त्यांना टक्कर देण्याचा आपला निर्धार अजून बळावला आहे, असे त्याने जाहीर केले आहे, म्हणून. ह्यानिमीत्त, 'बच्चे लोग, ताली बजाओ!'

दत्तकविधान-७

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तक मुलासाठी नावनोंदणी केल्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांनी आम्हाला पहिलं बाळ आज पाहायला मिळणार होतं. लग्नाआधीपासून ठरविलेल्या एका निर्णयाच्या पूर्ततेतला महत्त्वाचा टप्पा आज पार पडणार होता! त्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो होतो, पण मध्यंतरी परिस्थितीच अशी होती की आशा सोडून द्यायचे विचारही मनात येत होते. सुदैवानं ती लवकर निवळली आणि आज या महत्त्वाच्या वळणावर आम्ही उभे होतो. मी सकाळी रत्नागिरीहून पुण्याला आलो आणि 11 वाजता हर्षदासह संस्थेत दाखल झालो. आम्हाला तिथे दिवसभर द्यायचा होता. फॉर्म भरून देताना आमच्या मुलाखती आणि सविस्तर माहिती घेण्यात आली होती.

दत्तकविधान-६

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला सांगून झालं, पण आईवडिलांना सांगणं ही मोठी कसोटी होती. आम्ही घेतलेला निर्णय पालकांना उशीरा कळवला, पण त्याला अगदी कडाडून विरोध झाला नाही. "तुमचा निर्णय आहे ना, ठीक आहे. आम्हाला मान्य आहे,' अशीच सर्वसामान्य प्रतिक्रिया होती. तेवढंही दिलासादायक होतं. मूल मिळवण्याचं टेन्शन असताना हा आणखी एक ताण आम्हाला झेपणारा नव्हता. सुदैवानं तो टळला. दत्तक मुलासाठी देण्याच्या कागदपत्रांत आम्हाला ओळखणाऱ्या तीन व्यक्तींची ओळखपत्रं आणि आम्हाला भविष्यकाळात काही झाल्यास एका जोडप्यानं त्या बाळाची पूर्ण जबाबदारी घेण्याबाबतचं पत्र (बॉंड) देणंही आवश्‍यक होतं. माझ्या धाकट्या साडवानं ती जबाबदारी स्वीकारली होती.

दत्तकविधान-५

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला आम्ही दुसऱ्या बाळाविषयी अगदी सहजपणे सांगितलं. "तुला घरात एकटं वाटतं ना, कंटाळा येतो ना, मग घरात एखादं बाळ असेल तर किती छान,' हा तिच्या मानसिक तयारीचा मूळ गाभा होता. तिनंही ते सहज मान्य केलं. पण लहान बाळ म्हणून मावसबहिणीलाच तिनं जवळून पाहिलं होतं. त्यामुळं बाळ आणायचं ते मुलगीच, अशी तिची ठाम धारणा होती. मग आपल्या घरात आधीच तुम्ही दोन मुली (आई आणि ती) आहात ना, मग आणखी एक मुलगी आणली तर कशी चालेल? त्यापेक्षा मुलगा आणला, तर दोन मुलगे-दोन मुली (आई-बाबा व मनस्वी आणि तिचा भाऊ) होतील, असं तिला पटवून दिलं. तिलाही ते पटलं. शेजारी कळलं तरी हरकत नाही, अशी वेळ आली, तेव्हाच आम्ही मनस्वीला सांगितलं.

पाठलाग

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 12/03/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग गुंतुनी इश्कांत तुझिया , वैफल्यता मी ल्यायली. दर्द आठवणींचा उरी, झोप नित्त्याची लोपली ! मरण माझे याच देहि याच डोळा पाहिले, पोहोचलो मरणद्वारी परि,यातनांनी ना त्यागले ! होतो पहुडलो शांत येथे, आज मी सरणावरी, आलीस त्रास देण्या पुन्हा, काढीत माग इथवरी ! निरंजन वहालेकर
काव्यरस

कोल्हापुर

लेखक नाद्खुळा यांनी शुक्रवार, 12/03/2010 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या कामातून मित्रानो ,थोडा वेळ काढूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया रंकाळ्यावरचा मस्त वेळ एकदम झक्कास टी टाइम भेळ पुन्हा एकदा खाऊया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया युनिवर्सिटीताली सुखद संध्याकाळ पन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ पुन्हा एकदा पाहूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया मिसळेचा जेवढा झटका माणुसकीची तेवढीच गोडी पुन्हा एकदा चाखूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया कट्ट्यावरची मस्ती खासबाग ची कुस्ती पुन्हा एकदा खेळूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया -के गा