थोल पक्षी अभयारण्य- निसर्ग चित्रे आणि दुर्मिळ पक्षी.
अहमदाबादपासून जवळ ४० - ४५ किलोमिटर दूर शिलज नावाचे एक गाव आहे. त्याच्या जवळच थोल पक्षी अभयारण्य आहे. गेली अनेक वर्षे ईथे राहत असूनसुद्धा काही ना काही कारणाने तिथे जाणे जमले नव्हते. पण ओळखीच्या एककडून कळले की या वर्षी थोलला बरेच वेगवेगळे पक्षी दिसले आणि मग आम्ही ठरवले की या वेळी या जागेला भेट द्यायचीच.
ठरल्याप्रमाणे ३१ जानेवारीला सकाळी पाच ला ऊठून सगळ आवरून साडे सहाला आम्ही निघालो. वातावरणात सुखद गारवा होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही थोल च्या जवळ पोचलो. सकाळी सकाळी भारद्वाजाने दर्शन देऊन शुभशकुनाची नान्दी केली. पुढच्या १५ मिनिटात आम्ही चेक पोस्ट जवळ पोचलो.
मिसळपाव
सावल्या लांब व्हायला लागल्या तशी सूर्याला आपल्या विश्रांतीची वेळ झाल्याची जाणीव होते. आपली मंदावलेली सोनसळी किरणं गोळा करुन तो निघतो. दूरवर हलकेच पैंजणांचा आवाज येतो....तो वळून बघतो. आपली पायघोळ काळी चंद्रकळा नेसून...यामिनी नखशिखान्त चांदणं लेवून.....आकाशाच्या दर्पणात आपलं प्रतिबिंब न्याहाळताना त्याला दिसते. तो कौतुकाने हसतो. रोज तितक्याच तल्लीनतेने तिचं त्या दर्पणात न्याहाळण्याचं त्याला कौतुक वाटतं. तो कित्येकदा ते बोलूनही दाखवतो. तीही दिलखुलासपणे ते मान्य करते.