मी कात टाकली
(वैधानिक इशारा ः हा लेख म्हणजे हाताला झालेल्या इजेबाबतचा हलक्याफुलक्या शब्दांतील वर्णन आहे. कमकुवत हृदयाच्या वाचकांनी कृपया तो वाचण्याचं धाडस करू नये!)
कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे.
बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता.
मिसळपाव
गेले चार सहा दिवस
खरतर ह्या अॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस.
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.