Skip to main content

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग २

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 17/10/2021 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
०८ ऑगस्ट आजचा आमचा पहिला थांबा होता गणिगत्ती जैन मंदिर. अगदी साध्याश्या या मंदिराकडे लोकांना आकर्षित करेल असं काहीच नाही; ना भव्य आकार, ना कुठली आकर्षक कलाकुसर. मला मात्र हे मंदिर त्या काळच्या राजांच्या उदार आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक वाटलं!

कंटाळा

लेखक पाटिल यांनी रविवार, 17/10/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

सकाळ कोवळी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/10/2021 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई - पाषाणभेद १७/१०/२०२१
काव्यरस

सन्नाटा

लेखक भागो यांनी शनिवार, 16/10/2021 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
पक्की दुपारी “ खेळ खल्लास” सिनेमा बघून आला होता. त्याच्या सर्व आवडत्या सुपरहीरोंची झालेली दयनीय अवस्था बघून त्याला वाईट वाटत होते. सन्नाटा नावाच्या खलनायकाने सर्व सुपरहीरोंना पळवून लावून पृथ्वीवर कब्जा केला होता. हवाहवाईने केलेले हवाई हल्ले त्याने परतवून लावले होते. सूर्यकुमारच्या झळाळीला सन्नाटाने झाकोळले होते. सूर्यकुमारच्या तेजस्रोतामागे असणारी अणुप्रक्रिया त्याने ग्राफाईटचे अस्त्र सोडून बंद पाडली होती.त्यामुळे सूर्यकुमार खग्रास ग्रहण लागल्यासारखा निस्तेज झाला होता. मिस्टर इंडिया सन्नाटाच्या समोर जो अदृश्य झाला तो पुन्हा कोणालाही दिसला नाही.

कंबोडियाविषयी दोन लेखांची नोंद

लेखक गामा पैलवान यांनी शनिवार, 16/10/2021 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कांभोज देश अर्थात कंबोडिया याबद्दल संदीप कुलकर्णी यांनी दैनिक सकाळ मधल्या पैलतीर सदरात दोन लेख लिहिले होते. सकाळ वर्तमानपत्राचे सदर दुवे कालबाह्य झाले आहेत. म्हणून ते दोन लेख इथे डकवतो आहे. अशी डकवणी मिपाच्या नियमाविरुद्ध आहे. परंतु नोंद ठेवण्यासाठी या लेखाचा व चर्चेचा उपयोग होईल. तसंच सदर घटनेचा भारताच्या सुरक्षेशी व दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय धोरणांशी अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे सदर डकवणीचा अपवाद करावा ही संपादकमंडळास विनंती.

अवघाचि संसार- जांभुळपाडा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 16/10/2021 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ हरभटांनी अलिबागला जायला बोट पकडली. इतक्या दिवसांनी मुलाला भेटायला जाणार म्हणून भागीरथीबाईंनी त्यांच्या सामानात काय काय जिन्नस भरून दिले होते. खरेतर हरभटांच्या कपड्याची एकच पडशी होती आणि बाकीचे सामान सगळे रामसाठी दिलेल्या वस्तूंनीच भरून गेले होते. खरेतर भागीरथीबाईंना स्वतः च रामला भेटायची फार इच्छा होती, पण घराच्या सगळ्या रागाड्यातून त्यांचा पाय कुठे निघायला ?

उत्तर दे पण...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 16/10/2021 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून. इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
काव्यरस

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग १

लेखक एक_वात्रट यांनी शुक्रवार, 15/10/2021 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं ठिकाण पाहून झालं की त्याच जागी पुन्हा जायला मी नाखूश असतो; मला तो पैशांचा नि वेळेचा अपव्यय वाटतो. पण काही जागा याला अपवाद आहेत. ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, ओर्छा, मांडू, हंपी इ. काही. ह्या जागा पाहून झाल्या असल्या तरी आयुष्यात पुन्हा एकदा त्यांना भेट द्यायचा मानस आहे. ह्या यादीतल्या हंपीला भेट द्यायचा विचार बरेच दिवस मनात होता; शेवटी ह्या ऑगस्ट महिन्यात तो योग आला. मी पहिल्यांदा हंपीला गेलो ते २०११ साली. अर्थात् ती आमची धावती म्हणता येईल अशी भेट होती. आम्ही हंपी उरकली ती दोन दिवसांत आणि तीही काय पहायचे, कसे पहायचे याचे काहीही पूर्वनियोजन न करता.

भिंगना आवाज

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/10/2021 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आमच्या लहानपणी अनेक मुलं भिंग पाळायचे. भिंग नावाचा एक मोठा उडणारा किडा असतो. जंगलात बोर, बाभूळ, हेंकळ अशा काट्यांच्या झाडावर तो सापडतो. भिंगाचे पंख लाल, हिरवे, पिवळे असे वेगवेगळ्या रंगांचे असतात. अंगही रंगीत आणि चकचकीत असतं. डोकं सोनेरी रंगाचं असतं. भिंगाची मान आणि बाकी अंग याच्यात एक बारीक फट तयार होते… संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

चांदणी अन प्रियकर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/10/2021 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी एक चांदणी नवथर खाली आली धरणीवर काय कसले तिला ना ठावे इकडे तिकडे कोठे जावे भूकेलेली रडवेली रडून कोमेजलेली तशात भेटला तिजला प्रियकर अशाच चांदणीसाठी होता आतूर कोण कुठली तू आलीस कशी आपूलकीने त्याने केली चौकशी लांब असते दूरदेशी येथे परदेशी कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला मी तर तुझा आताचा प्रियकर घर तुझे कधीचे सुखकर नको तू गृह विरह सहू तू अन मी वेगळे होवू प्रियकर त्वरीत निर्णय घेई प्रियेस त्याच्या पोहचवून देई हा राहीला पुन्हा एकला रोज रात्री पाही तिजला चांदणीही विरहात तळपे अंधारअंगणी रात्रीस झळके दोन जिवांची अशी ताटातुट झाली प्रियक
काव्यरस