म्हातारपण!!! नको गं बाई..
अजून बस आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना घेण्यासाठी त्या स्कूलबसच्या पिक-अप- ड्रॉप ऑफ स्टॉप वर उभ्या होतो. इतक्यात बस आलीच. लेकाच्या वर्गात आमच्या कॉम्प्लेक्स मधली ४ जणं आहेत. आणि शिवाय के जी च्या दुसर्या वर्गात असणारी आणखी ५-६ जण आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या हे सगळे केजी'कर इतका चिवचिवाट करत असतात.. आपल्या बॅगा आयांच्या ताब्यात देऊन हे सगळे मस्त बागडत कुठे झाड्याच्या वाळलेल्या काठ्या गोळा कर, कुठे फुले तोड.. कुठे पेबल्स गोळा कर.. असं करत करत , शाळेत काय झालं हे सांगण्याची अहमहमिका लावत हे सगळे उड्या मारत घरी जातात. पण आज.. सगळंच शांत होतं. थोडं आश्चर्य वाटलं.
मिसळपाव