ओढ माहेरची
नुकतं लग्न होऊ दे नाहीतर लग्नाची पंचवीस वर्ष होऊ देत……. माहेरी जायचं म्हटलं की एक आगळाच आनंद होतो…….आईला आणि लेकीलासुद्धा. आपल्या कोडकौतुकात वाढलेली लेक एकदम दुस-याला देऊन टाकायची आणि मग वर्षातून किमान एकदा तरी तिला भेटायची इच्छा कुरवाळत कुरवाळत दिवस पुढे ढकलायचे. “निघाले आज तिकडच्या घरी….” म्हणणा-या लेकीला डोळ्यात साठवून अश्रूंच्या पडद्यातून निरोप द्यायचा आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं.
आपल्या भारतीय संस्कृतीतच असतं मात्र हे असलं जीव लावणं. सगळं आयुष्य मुलांभोवती गुंफ़णं. त्यांच्यापलीकडे विचारच करायचा नाही.
मिसळपाव