निष्क्रिय सज्जन म्हणजे...
- डॉ. सुधीर रा. देवरे
आपल्यातल्याच काही विभूती दैनंदिन स्तुत्य कृतीतून विकास पावत इतिहासात लोकदेव झाले. कृतीतून त्यांनी लोकांना त्यांच्यातला देवत्वाचा दृष्टांत दिला. परोपकार देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आयुष्यातील कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येतं. कृतीतून देवमाणूस होत जाणं साधी सोपी गोष्ट नाही. आपण अशा देवमाणसांचा आदर्श न घेता मंदिरं बांधून दानपेट्या ठेवत कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरु करतो.
माणसाला एकुलतं एक आयुष्य मिळतं. त्यातलं निम्म्याधिक आयुष्य झोपेत निघून जातं. बालपणातलं आयुष्यही बेरजेत नसतं. उरलेल्या आयुष्यात माणूस कष्ट करत दोन वेळचं जेवण कमवतो.
मिसळपाव
शके १८६० च्या चैत्र व. ६ रोजी सुप्रसिद्ध विद्वान् , मार्मिक संशोधक, मराठी व इंग्रजी भाषेचे विख्यात अभ्यासक भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचे निधन झाले.
शिक्षणक्रम पुरा झाल्यावर चिंतामणरावांनी प्रथम कोल्हापूर व ग्वाल्हेर संस्थानांत न्यायाधिशाचे काम केले.
शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली!
महाराष्ट्र संस्कृतीचा बनाव होतांना जे अनेक धर्मपंथ वा सांप्रदाय उदयास आले त्यांपैकी नाथसांप्रदाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले.
तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदेवराव यादव नांवाचा राजा देवगिरी येथे राज्य करीत होता.