Skip to main content

इंद्रधनू....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 07/06/2021 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनू... निरोप घेताना म्हणालो मी, माझी आठवण ठेव.. नशिबापुढे हतबल आपण, जोड्या ठरवतो देव.... क्षणात सारं बदललं तरी, विसरू कशी तुला..? तिचे साश्रुपूर्ण नयन, विचारत होते मला.... निशब्द शांततेत घुमला, उदास तिचा उसासा.. पण हात हाती घेऊन दिला, तिनंच मला दिलासा.... केली जरी प्रीती, पण सोडली नाही नीती.. अपराधासम खंत कशाला, सोड मनातील भीती.... शब्द असे पडता कानी, धरिले तिचे पाय.. परमहंस नाही गं मी, पण तू आहेस शारदा माय.... शेवटच्या त्या भेटीमध्ये, मनं झाली साफ.. विशाल हृदयाच्या तिनं, केलं मला माफ.... आयुष्यात आता पुढे जाईन, बाळगणार नाही तमा.. खूप समाधान देऊन गेली, तिची अनमोल क्षमा.... भांबावल
काव्यरस

हंस दर्शन

लेखक जुइ यांनी सोमवार, 07/06/2021 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळ्याच्या सुरुवातीपासून फेसबुकच्या स्थानिक फोटोग्राफी समुदायांवर हंसांचे फोटो बरेचदा दिसू लागले. आम्ही राहतो त्या मिनेसोटातल्या इतर ठिकाणी व ट्वीन सिटिजमधेही काही ठिकाणी हंस जवळून पाहता येतात असे कळले. ते फोटोज पाहून आपणही हंस पाहायला जावे असे प्रकर्षाने वाटू लागले. अखेर २७ फेब्रुवारीला उत्तम हवामान अन इतर गोष्टी जुळून आल्या अन आम्ही Vadanis Heights येथील Sucker Lake ला जायला निघालो. घरुन जालावर शोधून Sucker Lake Pavilion 2 चा पत्ता ठरवला होता. परंतु फोनच्या जीपीएस प्रणालीत नेमका Sucker Lakeच्या दक्षिणेकडल्या पार्कींग लॉटचा पत्ता टाकला गेला.
Taxonomy upgrade extras

कसाही बरसला, तरी मजा ती संपली.

लेखक Sanjay Uwach यांनी शनिवार, 05/06/2021 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
कसाही बरसला, तरी मजा ती संपली. मन घाबरे घाबरे, जीव झाला व्याकुळ कुठे दिसेना रस्ता, सर्व अंधार अंधार. कधी शित सरी मध्ये, नाहुनी निघालो सवगड्यांच्या संगे, चिंब चिंब झालो कधी थंड वारा अंगास झोंबला अंगातल्या रगेने,तो ही तिथे शमला पण आज तुला पाहताना, दूर दूर पळालो जीवाच्या आकांताने, घरा मधे धावलो कुठे आशेचा किरण, हळुच डोकावला काळया कुट्ट ढगा मध्ये, लख्ख विजेचा प्रकाश रोज ऐकुन नवीन नवीन, माणूस सरावला जीवाचा काय तो मोल, गेलेे सारे विसरून कोडग्या मनाला, आता काय ती भीती कसा ही बरसला, तरी मजा ती संपली.
काव्यरस

आईच तर आहे..!

लेखक पाटिल यांनी शनिवार, 05/06/2021 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते, असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..! आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं.. आणि काही दिवस तो विस्कटून जातो..! मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे... एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी.. विचारपूस करावी सगळ्यांची... स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे.. पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी... काळजी करू नकोस..

|चाफा|

लेखक सरीवर सरी यांनी शुक्रवार, 04/06/2021 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्राची ताईचा चाफा तुझी आठवण नागचाफा सळसळत केशर अत्तर मन माझे मोहणारा तुझी आठवण गुलाबी चाफा प्रीतधारा बरसवणारा रंगाने सदैव मोहवणारा तुझी आठवण कनकचंपा डुलत डुलत कर्णिकार मधाळ सुंगधी झंकारणारा तुझी आठवण देव चाफा रेशम निशा वेळी तेज:पुंज रोजच उजळणारा

प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 04/06/2021 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ आपली संयमी फलंदाजी तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले हीच ती शोएब अख्तर जिच्या शोधास मन आसुसले काय तिची ती अदा वर्णावी, बॉल टाकते गदागदा सेहवाग