चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा
आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही.
मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का?
मिसळपाव
