नमस्कार! मी चटोरी वैशू.... मला मिपा खूप आवडली... आणि मी इकडे प्रवेश केला... माझी आवडती भाजी मी इथे देत आहे... बघा तुम्हाला आवडली तर...
suggestions पण अपेक्षित आहे....
वेज फ्राय
साहित्य :
३ बटाटे, १ पाव भेंडी, ५ मोठ्या मिरच्या, ८-९ पाकळ्या लसून, अर्धी वाटी मटार किंवा चवडीच्या शेन्गाचे दाणे, १/२ च. जिरे, १/२ मोहरी, हळ्द, मीठ, कोथिंबिर , तेल ३ टि.स्पून, मिर्चि पावडर चवीपुरता, १/२ गरम मसाला इ.
कृती : बटाट्याचे सोलून पातळ पातळ काप करा (जास्त पातळ नाही किंवा जाड ही नाही... जे तेलात न करपता लगेच शिजतिल) . भेंडी ला मधुन चिर देवुन २ इंचाचे कापुन तूक्डे करा.