मिसळपाव राज्यस्तरिय दंगल
मित्रहो,
परवा दिनांक २१ जुन २००८ रोजी मौजे पुणे येथे आपल्या लाडक्या मिसळपाव वरिल रथी, अतिरथी, महारथी मल्लांची दंगल आयोजित करण्याचा मानस आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन दस्तुरखुद्द मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे सरदार तसेच आद्य सात्विक कट्टा प्रणेते महारथी छोटा डॉन उर्फ ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर उपस्थित रहाणार असुन ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथा ते सांगणार आहेत.
या काथ्याकुटाचा उद्देश इच्छुक मल्लांची (अन मल्लीणींची पन ;) ) नावनोंदणी तसेच आखाड्याची जागा अन सोयीची वेळ ठरवणे हा आहे.
मिसळपाव