Skip to main content

मराठी अंताक्षरी

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 17/09/2007 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र.

मुखडा-अंतरा

लेखक रोहिणी यांनी सोमवार, 17/09/2007 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा खेळ असा आहे की गाण्याच्या अंतऱ्यावरून त्या गाण्याचा मुखडा ओळखणे. यात आपण हिंदी गाणी घेऊ कारण हिंदी गाणी सर्वांना बरीच माहिती असतात. मराठीपण चालतील. जे कोणी गाण्याचा मुखडा ओळखेल तिने/त्याने दुसऱ्या गाण्याचा अंतरा द्यायचा. गाणे ओळखता आले नाही तर अर्थातच clue देणे. तर मग सुरवात करूया का? बागोमें फुलोंके खिलनेसे पहेले, तेरे मेरे नैनोंके मिलनेसे पहेले हे पहिले गाणे सोपे आहे म्हणून एकच ओळ दिली आहे. गाण्याचा अतरा मधे २-४ ओळि असल्या तर जास्त बरे होइल, गाणे जुने/नवीन माहिती नसेल तर त्याकरता ४ ओळी

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 16/09/2007 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल. त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा. आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो.

कूटप्रश्न

लेखक प्रियाली यांनी रविवार, 16/09/2007 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, ज्यांना कोडी आवडत नाहीत त्यांनी वैतागू नका! किंवा ज्यांना कोडी आवडतात त्यांनी आनंदीही होऊ नका कारण मिसळपावावर कोडी घालण्याचा माझा मानस नाही. एक प्रश्न गेले दोन दिवस सतावतो आहे. उत्तर मिळाल्यास अवश्य नमूद करा. मनोगताच्या सदस्यांना मनोगती म्हणतो. उपक्रमाच्या सदस्यांना उपक्रमी आणि मायबोलीच्या सदस्यांना मायबोलीकर. मिसळपावाच्या सदस्यांना काय म्हणावे? मिसळपावकर - काहीतरीच काय? मिसळपावी - कै च्या कैच! कश्टमर - अरे बापरे! तुम्ही सुचवा.

आजचा सुधारक

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 16/09/2007 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सुधारक हे विवेक वादाला वाहिलेले मासिक, गेली १८ वर्षे नागपुरहून प्रकाशित होणारं. लोकांना माहित असण्यापेक्षा माहित नसण्याचीच अधिक शक्यता. यातले लेख व संदर्भ चिंतनशील असतात. आगरकरांच्या ध्येयवादाचा पाठपुरावा करणारं,बरचसं गंभीर स्वरुपाच पण तरीदेखील रुचणारं, हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही. Picture

सखा श्रावण

लेखक चंद्रप्रभा यांनी रविवार, 16/09/2007 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
सखा श्रावण नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला -चंद्रप्रभा (येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)

विकास आराखडा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 16/09/2007 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
विकास आराखडा की आखाडा
कुठलाही आराखडा म्हटला की त्याला नियोजन लागते. नियोजनासाठी काहीतरी प्रयोजन लागते. पुण्याचा विकास आराखडा १९८७ पासून कागदावर आहे. लोकशाही मूल्यांच्या चौकटीत राहून शहराचा विकास करायाचा हे खूप कठीण काम आहे. खरं तर तो कठीण वसा आहे. बरं विकास तरी कशाला म्हणायचं? विकासाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळया आहेत. समजा संकल्पनाविषयी एकमत झाले तरी प्राधान्यक्रम वेगळे आहेत. शहरासमोर आज अनेक प्रश्न आहेत.

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/09/2007 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?