Skip to main content

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी सोमवार, 12/01/2026 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो. x विनोदकुमार शुक्ल गेले. हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला. त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती.

व्हेनेझुएला

लेखक खटपट्या यांनी रविवार, 11/01/2026 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका आळसावलेल्या रविवारी माझा परममित्र बंडू सकाळी ८ वाजता माझ्या दारात येऊन उभा राहिला. मी - काय रे इतक्या सकाळी ? बंडू - झोपा काय काढताय ? जगात काय चालू आहे याचा काही थांगपत्ता नसेलच तुमच्या सारख्या लोकांना ! बंडू नेहमी मला "तुमच्यासारख्या लोकांना" असेच संबोधतो. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा (म्हणजे कोणत्या लोकांचा हे त्यालाच माहित) एक समूह आहे. आणि मी आमच्या सारख्या लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना काही सांगायचे असेल तर हा भल्या सकाळी येऊन माझ्यावर तोंडसुख घेतो. मी - काय झालं जगात? मला कसं माहीत असणार ? बंडू - व्हेनेझुएला माहीत आहे का ? मी - नाही ! बंडू - देश आहे एक.

शहाणपण शोधतो मी...

लेखक बाजीगर यांनी रविवार, 11/01/2026 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
Intelligence is abundant in the world, I'm searching wiseness...  जगात, बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी | मोठेपणा खूप झालाय,  लहानपण शोधतो मी | तर्क कुठे उगाळावा,  सहाण पण शोधतो मी | माणुसकी ची पाणपोई, तहान पण शोधतो मी | प्रत्येक उत्तर chat gpt ला, विचारणाऱ्या पिढीच्या, छद्मी AI पासून दूर नेणारे, वाहन पण शोधतो मी | शुष्क तार्किक संवादात, मायेचा ओलावा कळेना, जुन्या अडाणी प्रेमाचा, जहाँ पण शोधतो मी | बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी |

दहा मिनिटांत घरपोच.

लेखक chetanasvaidya यांनी रविवार, 11/01/2026 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

परदेशातील समाज जीवन

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 10/01/2026 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझं काम गुण्या गोविंदाने करत असताना, सर्व व्यवस्थित सुरळीत चालू असताना. (मी कितीही कठीण काम असलं तरीही ते सुरळीत च करतो. आरामात च करतो, यामुळे काही वेळेला काही लोक नाराज होतात पण मी नेहमी क्लायंट आणि अंतिम आउटपुट चा विचार करतो, असो) एक दिवस मला गोऱ्या बॉस चा फोन येतो, मी एक माणूस पाठवतो आहे, मी - कशाला? बॉस - त्याला "ठेवून घे" मी - म्हणजे? बॉस - नंतर सांगतो, आयला लोक बाई ठेवतात, माझा बॉस मला एक जरड 63 वर्षाचा म्हातारा ठेवायला सांगत होता, सांगितल्या प्रमाणे हा अमेरिकन म्हातारा आला, ठोंब्यासारखा समोर बसला, त्याला विचारले - काय येतं तुला? म्हातारा (त्याचे नाव जॉन) - तू देशील ते काम करेन!