कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?
कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?
-राजीव उपाध्ये
ए०आय०चा बुडबुडा फुटणार अशा आरोळ्या ऐकायला मिळाल्या की मला पञ्चतंत्रातील बैलाचे वृषण आज ना उद्या गळून पडतील आणि आपल्याला मस्त मेजवानी मिळेल या आशेने मागेमागे जाणार्या दोन कोल्ह्यांची आठवण होते.
अलीकडच्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – ए०आय०) या तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने प्रसार केला आहे. उद्योग, वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण, संरक्षण आणि दैनंदिन जीवन—असे जवळजवळ सर्व क्षेत्र ए०आय० च्या प्रभावाखाली आले आहेत.
मिसळपाव
ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing !
अरे, नुसता ठोंब्यासारखा काय बसला आहेस, उठ आणि अभ्यासाला लाग बघू किंवा एखादे सांगितलेले परंतु अजून बाकी असलेले काम केले नसेल ते करण्यासाठी लहानपणी नेहमी "ठोंब्या" असा उद्धार होत असे. त्यात अस्मादिक शेंडेफळ असल्याने "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये" ह्या उक्तीनुसार घरातील सर्वांकडून अगदी हक्काने विविध कामे अंगावर पडत असत.
इतिहासाची दुरुस्ती
==========
- राजीव उपाध्ये
इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो.
एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली
मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.