पार्करचे पेन
पार्करचे पेन
======
-राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४)
मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती.
भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.
व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचन प्रयोग
व्हिन्सेंट व्हान गॉग (१८५३-१८९०)
उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.
उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !
पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण.
ये दिल मांगे मोर!
प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच.
त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात.
दशावतार - आठवणींची साठवण
||श्री कातळोबा प्रसन्न||
ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण.
शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं.
मिसळपाव