विषारी (टॉक्सिक) माणसे
आयुष्य शांततेत घालवायचे असेल तर आयुष्यात दुष्ट आणि विषारी लोकांना खड्यासारखे बाजूला करता आले तर आयुष्य प्रवाही बनते. ही माणसे सहसा कोडगी असतात आणि परत-परत आपले विषारी अस्तित्व प्रकट करत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवताना चडफडतात आणि उघडी पडतात आणि मग जिवाच्या आकांताने अनैतिक मार्गाचा अवलंब करतात. आपण सावध राहिलो तर एक वेळ अशी येते की मग ती उघडी पडतात.
काही वर्षापूर्वी एका मानसोपचार तज्ञाने मला फेबुवर फ्रेण्ड-रिक्वेस्ट पाठवली आणि मी ती स्वीकारली. मी तेव्हा फोटोग्राफी करत असे. ही व्यक्ती पण थोडी फोटोग्राफी करायची पण त्यात वैविध्य किंवा प्रयोग नव्हते.
नवरात्री निमित्ताने
#नवरात्री निमित्ताने
परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बदलले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या.
‘कालान्तर’ : समाजातल्या व्यापक पडझडीचे वास्तवदर्शन
गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे.एआय आणि उत्पादकता
आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
माझी कन्या शाळेत असताना बर्याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्यापैकी पुढे होती.गावाची ख्याती
परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो.
सोबत काही बिस्किटे ही खाल्ली.
खपली
सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला.
फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले.
ताईच्या सासर्यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती.
सागर तळाशी
सागर तळाशी | तुटल्या केबल
त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ ||
बाह्य जगताशी | संबंध तुटला
येरू डोकावला | आत तेव्हा || २ ||
अनाहत नाद | आला समेवर
कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ ||
स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात
ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||
मुसळधार पावसाने....
या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र......
नाही दिली उसंत सावराया जिर्ण पाले
मुसळधार पावसाने गर्विष्ठ ...... हवेल्यानां शांत केले
हिरव्या माळरानी ना ही कळ्या उमलल्या
मुसळधार पावसाने, व्यथा..... खडकात जिरून गेल्या
अंडी फुटून गेली आळ्या मरून गेल्या
मुसळधार पावसाने फुल..... पाखरांचा काळ केला
कुंठल्या श्वान चाळा विरह गीत गाती
मुसळधार पावसाने Xxxx.... भादव्यात घात झाला
त्या वाकड्या पुलांच्या (Z ब्रिज) रेषा सरळ झाल्या
काव्यरस
मिसळपाव