Skip to main content

दोसतार-४१

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/03/2020 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी डोळे मिटून घाटे सरां नी सांगितली असती तसे .काहितरी गम्मत सांगतोय तशा आवाजात भिंतीला गोष्ट सांगतोय . " खूप गोड गळ्याने भजने गायचा अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती होती." माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारतय. छे मुलांनी शंका विचारताना अशी सरांच्या खांद्यावर थाप मारायची नसते…. मागील दुवा : http://misalpav.com/node/46184 मी दचकून पाहिले, टंप्या माझ्या खांद्यावर थाप मारत होता. टंप्याला त्या शिपाईमामांच्या टोपीत मी अगोदर पटकन ओळखलेच नाही. म्हंटले कोण आल्ं हे. बाकाच्या मधोमध बसलो होतो म्हणून ठीक कडेला असतो तर दचकून पडलोच असतो. काय रे… काय झाले. काय झाले !

मस्त असे दोन प्रकारचे टोस्ट

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 09/03/2020 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट आणि चवीला मस्त असे दोन प्रकारचे टोस्ट - पावावर चेदार किंवा टेस्टी जातीचे चीज पसरावे + हिरवी मिरची / कोथम्बीर चटणी, आणि ग्रिल खाली भाजावे, चीज तांबूस होऊन त्याला कडक पापुद्रा येईपर्यंत असे भाजलेले चीज मस्त लागते - वरील प्रमाणेच परंतु भारतीय हिरव्या चटणी ऐवजी पेस्तो नावाची इटालियन चटणी घालता येईल ( खायची तुळस , काजू , मीठ, ऑलिव्ह तेल यांची चटणी ) IMG_6

स्त्रीशक्ती १: मारी क्यूरी

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 08/03/2020 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिनानिमित्त लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. त्यात तेजस्वी कर्तृत्त्व असलेल्या काही महिलांबद्दल लिहिले आहे. त्यातले हे पहिले पुष्प. शालेय विद्यार्थ्या पासून वृद्धापर्यंत बहुतेकांना ज्ञात असलेले नाव मादाम क्यूरी. मूळ नाव मारिया श्क्लोदोव्स्का - Maria Sklodowska नंतर मारी क्यूरी या नावाने जगभर ख्यातकीर्त. जन्म पोलंडमधील वॉर्सॉ इथे दि. ७ नोव्हेंबर १८६७. शालेय पाठ्यपुस्तकापासून तिचे नाव रेडीयम या मूलद्रव्याशी आणि किरणोत्सर्जनाशी जोडलेले आहे. किरणोत्सर्जनाचा भौतिकी दृष्टीकोनातून अभ्यास हा तिचा संशोधनविषय.

अपुर्ण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 08/03/2020 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्ण का कोरतेस, काजळ तु कुरंग नयनात, नसेल बघणार मी, तर श्रुंगार व्यर्थ आहे * का लिहितिस त्या भावपुर्ण कविता नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत * जरी माळला ,सुगंधित मोगरा तु कुंतलात स्पर्षाविना माझ्या, तो साजणे, गंधहिन आहे * लावलेस जरी अस्मानि सुर तु गळ्यातुनि माझ्या साथि विना ति मैफित अधुरी आहे * जरी जगात प्रेम आहे, हे पुर्ण सत्य आहे तरी माज्या विणा साजणे, मात्र सारे मिथ्य आहे * का रेखाटतेस हट्टाने ,सुख चित्र भविष्याचे भरु देत रंग मजला, अन्यथा ते बेरंगी आहे * समजुन घे, तु माझी,मी तुझा हे प्राक्तन आहे एकमेका विना आपल्या दोघांचे जिवन अपुर्ण आहे

शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 07/03/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा साहित्य: सारणासाठी: तांबडी ढब्बू मिरची बारीक चिरलेली/ कांदा बारीक चिरलेला / ३-४ प्रकारची कडधान्ये भिजवून उकडलेली ( मेक्सिकन बिन मिल्यालास उत्तम नाहीतर छोले राजमा इत्यादी पण त्यास भारतीय मसाला लावू नये ) काळे kalmatta ऑलिव्ह ( हे व्हिनेगर किंवा ऑलिव्ह तेलात मुरवलेले मऊ असावेत, कोरडे सब्वे च्या सँडविच मध्ये घालतात ते नको , मश्रुम बारीक कापलेले, लसूण - पोळी: मक्याची असेल तर उत्तम नाही तर मैदा जास्त आणि थोडी कणिक ( नुसती पोळीची कणिक वली शक्यतो नको) अशी - चिपोटले मिरची चा स्वाद असलेले चीज किंवा एखादे थोडे धुरी दिलेले ( स्मोकड ) चीज + टेस्टी चीज ( अमूल बनवते ते

मुंगूसाची गोष्ट- भाग २

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 07/03/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

जात नाहीं जात ती जात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/03/2020 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
जात नाहीं जात ती जात विलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि..