Skip to main content

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 24/02/2020 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला जीव माझ्झा कासावीस झाला असलीस जरी तू तोंडाने फाटकी तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी रंगबिरंगी चांदण्या त्यावरी झेलण्या ओघळण्या पाऊस सरी कापड ऐसे तरल मुलायम पिळवटते हे हृदय ते कायम सडपातळ ती नाजूक दांडी बघणार्यांच्या उडती झुंडी बटनावरती नक्षीदार दांडा देती सलामी बघणाऱ्या सोंडा काय असे ते गुपित न कळले त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले मीही नसे अपवाद त्याला मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला =========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

ग चांदण्यांनो

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 24/02/2020 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नका ग चांदण्यांनो नका येऊ खिडकीत तिच्या मनाचा ठाव सांगा येऊन पडवीत सांगा तिच्या गाण्यात का, आहे नाव माझे? माझ्याविन विरहाचे का, सोसते ती ओझे? ठावे तिलाही आहे का, रात्री कवितांचे येती जथ्थे, जाती स्वप्न गाऊन उद्याचे? आतूर प्रीत आत रोज झुरते उरात सांगा तिला हे सारे चमचमत्या सुरात तिचे चालणे बोलणे भास होऊन छळते लय श्वासांची तेव्हा आठवांशी अडखळते सारे आठव आठव युगांच्या जणू फेऱ्या रेखू पाहती नशीबाला तळहातावर कोऱ्या पसा पसा सुखाचा तिला देईन मोजून बघा चांदणझुल्याचे झोके रितेच अजून जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे - संदीप चांदणे (२४/०२/२०१९)

दोसतार - ३९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/02/2020 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
एल्प्या सातवी ब ला समांतर रेषा शिकवायच्या म्हणून वर्गावर गेला. तो गेला . योग्या संगीता आणि जयु त्यांचे त्यांचे तास घेऊन आले. तीघांचेही चेहेरे वेगळेच सांगत होते..... मागील दुवा : http://misalpav.com/node/46136 शिक्षक दिनाला आठवीच्या बहुतेक सगळ्यांनाच काहीना काही शिकवायचे होते . त्यामुळे प्रत्येकाला हवा होता तोच विषय शिकवायला मिळाला होता असे झाले नव्हते. घाटे सरांनी आणि तारकुंडे बाईंनी त्या उलट ज्याला जे विषय कठीण जातो तोच शिकवायला सांगितला होत. योग्या खरे तर पी टी शिकवणार होता. पण त्याला सहावीच्या वर्गावर इंग्लीश चा तास घ्यायला सांगितला होता.

चित्रे भाजीची...

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 23/02/2020 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाककृती नाही फक्त काही चित्रे भाजीची... १) सिल्वर बिट चे प्रकार IMG_6093[1] २) झुकिनी ची फुले ( भज्यांसाठी)

हैननीज चिकन राईस

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 23/02/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सिगापोर चा राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून जो मानला जातो तो म्हणजे "चिकन राईस " साहित्य - अख्खी कोंबडी , देशी असेल तर उत्तम - आल्याचे मोट्ठे काप - लसूणीच्या पाकळ्या - गाजर - पातीचा कांदा - लाला मिरची ठेचा + लसूण / सॉस - बर्फ - जस्मिन तांदूळ -कोंबडी ला साधारण कोलीत तापमान आल्यावर ( रम टेम्प ) मीठ लावून त्यास मालिश करावे (थोडीशी चरबी वेगळी काढून ठेवावी ) - त्यात लसूण आले पातीचा कांदा, गाजर मधल्या जागेत भरावा - मोठया पातेल्यात थोड्या तेलावर चरबी आणि लसूण आणि आले परतावे त्यात मग पाणी घेऊन ते गरम होऊ दयावे - पाणी गरम झाल्यावर त्यात अलगद हि मालिश केलेली कोंबडी सोडावी व शिजू दवयवी ..

ढब्बू मिरची पनीर इंडो चिनी

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 23/02/2020 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आंबट गोड खारट अशी काहीशी चव आणण्याचा प्रयत्न आहे यात साहित्य -ताज्या लसणीचे काप - पनीर चे छोटे तुकडे -छोटे चेरी टोमॅटो - हिरव्या ढब्बू मिरची चे माध्यम काप - तांबडे तिखट ?( फ्लेक) - पातीचा कांदा ( पाहिजे असल्यास कोथिंबीर) - पांढरे व्हिनेगर - शेंगदाणा तेल - गोड मिरची सॉस ( स्वीट चिली सॉस) - जाड लोखंडी तवा आणि वॊक एकीकडे जाड लोखंडी तवा ( फोटोत ग्रीडल वापरले आहे) चांगलं गरम करून त्यावर तेल सोडावे आणि ढब्बू मिरची चे तुकडे भाजावे / परतावे ( तवा जाड असावा उपहारगृहात कबाब / सिझलर ज्यावर वाढतात चुर्रर्र आवाज करीत तसला ) कढई किंवा वॊक चांगलं तापल्यावर तेल घालून लसूण परतवूं घायवी आणि त्यावर

शेवया मश्रुम !

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 23/02/2020 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
शेवया मश्रुम ! घाबरू नका शेवयात मश्रुम घालून काही तरी करा असा हा पदार्थ नाहीये तर शेवया सारखया दिसणाऱ्या मशरूम ची हि चट्पट भाजी साहित्य : आलेल्या लसणीचे बारीक काप/ तुकडे सोया सॉस शेवया मश्रुम (एनोकी मश्रुम ) तिळाचे तेल आणि भाजलेले तीळ गरम कढईत तेल घालू तेल तापल्यावर लगेच लसणाची काप तळून घावेत शेवटी मश्रुम चे लांबीनुसार २/३ भाग कर्वे आणि कदाचीत सोडवत व परतावे ... थोडे शिजल्यावर ( झाकण ठेऊ नये) तिळाचं तेलाचे थोडे थेम्ब सोडावेत चवील मीठ ( सोया मध्ये खूप मीठ असेल तर नको ) गरम गरम वाढताना साथीला पतीचं कांद्याच्या काड्या कापून सजवावे वरती भाजलेले तीळ भुरभुरावे ( चित्रात तीळ नाहीयेत आज नवहते

दोसतार - ३८

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 23/02/2020 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
आंजीने तीच्या नेहमीच्या लाल रेबीनी ऐवजी कसल्याशा मोठ्या प्लास्टीकच्या हिरव्या पिना वेणीला बांधल्यात. डोक्यात नाकतोडे बसल्यासारखे दिसतय शुभांगी ने दुमडलेल्या वेण्या आणि त्यावर कसलासा गजरा घातलाय. तीचे डोळे चमकताहेत. पिवळ्या साडीत सगळ्यात ठळ्ळक दिसतेय. हसताना… मागील दुवा : http://misalpav.com/node/46117 हसताना तीचे डोळे चमकतात हे आत्तापर्यंत कधी माहीतच नव्हते. आणि हसली की चेहेर्‍यावर पाँड्स पावडरचे फूल फिरवल्यागत हसतेय. दिवाळीत ती हसणारी पिवळी फुले येतात ना तशी दिसतेय.

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/02/2020 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने... मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत.

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/02/2020 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिन्यांनंतर मिपावर आले आहे... लेखन तर नाहीच पण वाचन देखील काही महिने जमलं नव्हतं. पण आता परत एकदा सगळंच सुरू करीन म्हणते. #नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन! वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते.