देशस्थ व कोकणस्थ
परवा सावंत नावाचा मित्र भेटला...
प्रोपर सावंत वाडीचा ..
गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ सावंत आडनावाचे दोस्त आहेत..
काहि फेसबुकावर पण आहेत..
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
म्ह्णजे??
ते देशस्थ मराठा आम्हि कोकणस्थ मराठा..आमचे मसाले खाद्य पदार्थ निराळे
त्यांचे निराळे..ामचा मालवणी मसाला त्यांचा कोल्हापुरी मसाला...
काका तुम्ही "काहे दिया परदेस "सिरियल बघता का?
बघतो ना....
त्यातली गौरीची आज्जी जी कोकणी मिश्रित मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो...
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली..
किति विविधता आहे..
मिसळपाव