श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार
|| श्रीराम समर्थ ||
बाहेर एकदम जोरदार पाऊस कोसळतोय . नदीच्या दुथडी भरुन वाहणार्या पाण्याचा खळखळाट अगदी इथवर ऐकु येतोय , नदी धुसरशीच दिसत आहे पण तिचं अस्तित्व अगदी सुस्पष्ट जाणवत आहे. अधुन मधुन जोरदार विजा कडाडत आहेत अन त्याच्या प्रकाशात निमिषार्धच नदी चा प्रवाह उजळुन निघतोय. आणि आपण हे सारं अनुभवतोय ह्या जुनाट शिवालयाच्या आसर्याला बसुन ! जुनेच पण प्रशस्त आणि आत्ता ह्या वेळेला तर अगदीच निर्जन. अगदीच नाही म्हणायला मंदिराच्या दुसर्या कोपर्यात बसलेले ते २ ४ सन्यासी आहेत , पण त्यांचीही काही बडबड नाही , ते त्यांच्या गांजासेवनात सुखाने तल्लीन झाले आहेत.
मिसळपाव