मुंगूसाची गोष्ट
।। मुंगूसाची गोष्ट ।।
' गोष्ट ' हा शब्द ऐकल्यावर कान टवकारले जात नाहीत; नीट सरसावून बसत नाही; भुवया आभाळापर्यंत उंचावून उत्सुकता चेहऱ्यावरून सांडत नाही; आपण ज्यांच्याशी गप्पा छाटत होतो त्यांनाच गप्प करत "जरा ऐकू दे रे." असं म्हणत नाही, आहे का असं कोणी? दुसऱ्याही प्रकारचे मनुष्य असतातंच. म्हणजे " हा मला काय अक्कल शिकवणार? ", " हा कुठली गोष्ट सांगणार ते मला माहितेय.", "मला माहीत नाहीत अशा गोष्टीच नाहीत." अर्थात ही वाक्ताडनं मनातल्या मनातंच हो.
मला कुठे शोधशील ?
वाहत असेल झरा संथ
त्याच्या काठाशी बघ
पाण्यात पाय बुडवून
बसले असेन स्तब्ध
बहरली असेल बाग
एखाद्या झाडापाशी बघ
फुलांशी हितगूज करत
पाहत असेन पाखरे स्वच्छंद
हिरवाळलेला डोंगर
त्याच्या माथ्यावर बघ
घोंघावता वारा अंगावर घेत
असेन स्वतःच्याच विचारात गर्क
जर कुठेच नसेन मी
होत नसेल माझ्या
अस्तित्वाचा बोध
तू मला माझ्याच
कवितांमध्ये शोध
- सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस
छपाकसे पेहेचान ले गया...
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं.
हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे-
1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.
कूर्ग डायरीज ५
दिवस दुसरा :
पहिला दिवस तर छानच गेला होता त्यामुळे कूर्ग सहलीत आणखी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तर खूपच होती. कुर्गचे वातावरण खूपच आल्हाददायक आहे. इथला पावसाळा तर खूपच खतरनाक असतो. एकतर वळणावळणाचे डोंगरातून जाणारे अरुंद रस्ते आणि मुसळधार पाऊस यामुळे बाहेर निघणेही कठीण होऊन बसते असे मला काही स्थानिकांनी सांगितले. कूर्ग मधील पावसाचा थोडासा प्रत्यय मला बेंगळुरूहुन कुर्गमध्ये येत असतानाच आला होता. जणूकाही मुसळधार पाऊसधारांनी आमचे स्वागतच होत होते.
अंधारछाया भाग ३ प्रकरण २ - अहो थर्डक्लासातच पाहून ठरवलत होय मी नापास म्हणून? फर्स्टात नंबर असणार माझा.’
अंधार छाया
दोन दादा स्वामींची मात्र कमाल आहे. माझ्यासाठी स्वामींनी नातू शेठना शब्द टाकला! म्हणाले , ‘ शेठ, या जनार्दनला चांगलासा धंदा द्या बरं. सचोटीचा व चार पैसे मिळवणारा हवा. इथे इस्लामपुरात आल्यापासून माझ्या माहितीचा आहे हा. विश्वासू आणि सरळ मनाचा आहे. सध्या त्याला काही धंदा हवा आहे. मी त्याला ओळखतो. माझी दीक्षा घेतलीयाय त्याने. त्याला धंदा देणे तुमचे काम.’ शेठ काही बोलले नाहीत. पण नाही ही म्हणाले नाहीत. नंतर खाली डॉक्टरांच्याकडे चौकशी केली. दुसऱ्या दिवशी मला भेटायला सांगितले. पुढे मी भेटलो. त्यांच्या सोबत माधवनगरला आलो.दोसतार - ३३
" एहेरे ….. शिक्षकांचे कोणी लाड करतेका? लाड लहान मुलांचे करतात" पम्याने बोलायची संधी बरोब्बर साधली. माझ्या डोळ्यापुढे प्रत्येक विद्यार्थी पुढे येवून शालाप्रमुख सरांचा गालगुच्चा घेवून जातोय असे चित्र येवून गेले. " सांगा सांगा . अजून काही सूचना असतील तर सांगा" सोनसळे सरांची आज्ञा शिरसावंद्य मानत शिक्षक दिन कसा साजरा करायचा याची चर्चा सुरू झालीमागील दुवा http://misalpav.com/node/45909 शिक्षक दिन साजरा करायचा तेही वेगळ्या पद्धतीने. पण सर शिक्षक दिन का साजरा करायचा?
सनकी भाग ४
वेस्टर्न फॅशन हाऊसची एक टीम मिटिंगसाठी आली होती.मिटिंग कॉफर्न्स हॉल मध्ये सुरू झाली. मिस्टर विल्सन स्मिथ हे टीम लीडर होते व त्याच्या बरोबर आणखीन दोन जण होते. त्यातला एक महाराष्ट्रीयन होता. कायाने त्यांना बसायला सांगीतले व ती म्हणाली
काया, “ good afternoon all of you and welcome Mr smith ,what is the project? give us some information about that.” ती अस बोलून खाली बसली. मिस्टर स्मिथ आता उठले व बोलू लागले.
मिस्टर स्मिथ,“ good afternoon , we have to launch our brand in India. And your fashion house is best for that. Mr mane explain it well in marathi.
मिसळपाव