Skip to main content

सनकी भाग ५

लेखक शब्दांगी यांनी बुधवार, 15/01/2020 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी परत शिवीन काया फॅशन हाऊसमध्ये गेला. जानं त्याला भागच होत कारण हे एकच प्रोजेक्ट त्याला फाईनान्सशियल क्रायसेस मधून बाहेर काढू शकत होते. पण आज ही चार तास बसून काया त्याला भेटली नव्हती. तो चांगलाच भडकला व रिसेप्शनिस्टला बोलू लागला. शिवीन, “ what the hell is that? आज तर तुमच्या मॅम भेटणार आहेत का मला? नाही तर मला Mr मानेंशी बोलावं लागेल.” रिसेप्शनिस्ट ,“ प्लीज सर तुम्ही बसून घ्या; मी मॅमना फोन करते. सध्या त्या मिटिंगमध्ये आहेत. ”अस म्हणून तिने इंटरकॉमवर फोन केला व शिवीन आल्याची माहिती दिली. शिवीन वाट पाहत होता.

प्रश्न..!

लेखक महेंद्र दळवी यांनी बुधवार, 15/01/2020 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसानंतर मंदिराच कवाड बंद दिसलं. चला देवाने ही रजा घेतली. आस्तिकांचं गाऱ्हाणं ऐकून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना 'तो' ही थकत असेल म्हणा... पण एक मात्र चांगलं झालं, मनात दडलेले असंख्य न पटणारे अनुत्तरित विज्ञानवादी प्रश्न तुझ्याकडे मांडायला माझा नंबर लागतोय आज. . - एक नास्तिक (तळटीप :- मी नास्तिक नाही..) #mD...

कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - १

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 14/01/2020 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटका - समुद्र आणि सह्याद्री - १ कर्नाटक राज्यास कारवार ते मंगळूर समुद्र किनारा पश्चिमेला लाभला आहे. राज्याच्या पूर्व भागातले हंपी, बेंगळुरु हे भाग पाहिले होते पण सह्याद्रीचा पश्चिम घाट कसा आहे हे पाहण्याची उत्सुकता होती. 'कोस्टल कर्नाटका' #नावाच्या सहली आहेत त्यात काही ठिकाणं दाखवतात. बरीचशी धार्मिकच आहेत. नकाशे आणि माहिती वाचून एक छोटीशी सहल आखली. त्यात तीनचार समुद्र किनारे, एक ऐतिहासिक ठिकाण ठरवले. रेल्वे आणि स्थानिक एसटी बस मार्गे जेवढे होईल तेवढेच. एक धावती भेट. शिवाय ट्रेकिंग करता येण्यासारख्या काही जागा तपासणे हा हेतू होताच.

चांदणं चाहूल

लेखक चांदणशेला यांनी मंगळवार, 14/01/2020 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
सांगू कशी मी खुळी प्रीत मोडू कशी उभ्या जगाची रीत तुझ्या वाटेवर धावते ही नजर येशील का शोधीत माझे घर अनोळखी सुरांचे उमलून आले गीत लागली तुझीच रे काळीजओढ ह्रदयाला झाला वेदनेचा स्पर्श गोड चंद्रसावल्यांनी मोहरली काळोख्या मिठीत रात हळूच आली तुझी चांदण चाहूल स्वप्नातल्या पाखराची पडली वेडी भूल दडवू कसे हसऱ्या ओठांतले गुपित
काव्यरस