दिवाळी सेलिब्रेशन !!!
दिवाळी सेलिब्रेशन !!!
साधारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मी भाऊबीजेला दादाकडे गेले होते. दादा, माझ्या चुलत बहिणीला आणि तिच्या दोन मुलांना पण घेऊन आला. बरेच दिवसांनी घरात खूप जण जमलो होतो. नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. एक एक भाऊ येत होता ओवाळणी होत होती, गोडाधोडाचं जेवण जेवून भेटीगाठी होऊन तृप्त होत होतो. दुसऱ्या दिवशी काय डोक्यात आलं माहित नाही, आज जेवण बाहेरून मागावूया म्हणून ठरलं. आता दादाच घर हे मुंबई गोवा हायवेला जरी असल तरी आहे ते खेडेगावचं. शहरात झोमॅटो नि स्वीगी वरून ऑर्डर करतात तसं काही शक्य नाही. गावात जरा बरं असं हॉटेलदेखील नाही.
मिसळपाव