भीतीच्या आरपार (कथा)
पुन्हा एकदा आलेली खोकल्याची उबळ त्याने महत्प्रयासाने दाबली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमला की, अघोरी शक्ति पाहून एखादे घुबड चित्कारले आहे का? असा भास होत होता. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते, तशी घरघर त्या छातीच्या पिंजर्यातून सारखी बाहेर यायची. अधून मधून खोकल्याची उबळ उफाळून वर यायची. एरव्ही तो मनसोक्तपणे खोकलला असता. पण या वेळची परिस्थिती वेगळी होती. या अशा काळ्याकभिन्न परिसरात तो एकटाच चालत होता. सोबतीला या काळोखाशिवाय चिटपाखरूही नव्हते.
मिसळपाव

भोळा शशी...
आमच्या आवडीचे गाणे आम्ही ऐकत होतो... कहीं दिल ना चुराले मौसम बहार का...