'तंबोरा' एक जीवलग - ६
कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण सोपे नसते. जे शास्त्र शिकायचे ती कला असेल तर ते आणखीन कठीण होते. त्यातही गाणे असेल तर महाकठीण. आईची तारेवरची कसरत पहात माझे असेच मत झाले होते. पुढे माझे गाण्याचे शिक्षण सुरू झाले तसे माझे हे मत दृढ होत गेले. आज तर त्यात काहीच संशय नाही.
गानकला शिकून तिचा व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे जन्मजात असाव्या लागतात, काही आपल्या नशिबात असाव्या लागतात तर काही कष्ट करून मिळवाव्या लागतात. पैकी कंठात सूर आणि विद्या ग्रहण करण्याइतपत बुद्धी हे भांडवल जन्मतः असावे लागते.
मिसळपाव