Skip to main content

कवित्व इथले संपत नाही

लेखक mrcoolguynice यांनी गुरुवार, 30/05/2019 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
कवित्व इथले संपत नाही रोज गळवं ठणकत राहते प्रोवक्ता अजुनही गातो पाठशाळेत शिकवीली गिते ते झरे भक्तीउमाळ्याचे ती उधारीची भगवी माया यांच्यात खपलो आपण फुकां पुन्हा उगवाया जोरात इंद्रिये अवघी भुणभुणायची दुःख सैनिकांचे आठवणार नाही आता स्मरण त्यांच्या त्यागाचे ती जळमटं मेंदुत विणलेली आयुष्य कुरवाळायां गेली बेरोजगारीच्या वनवासातील अनस्थेशिया जणु उरलेला
काव्यरस

वदनी कवळ.....

लेखक फुंटी यांनी बुधवार, 29/05/2019 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म
काव्यरस

चार शब्द - पुलं - एक वाचनीय पुस्तक

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 29/05/2019 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्‍या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच.

जिवंत पण जाणीवरहित

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 29/05/2019 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते.

नाद ब्रम्ह होई अंगी , चढे चढे भक्तिज्वर

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 28/05/2019 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
नाद ब्रम्ह होई अंगी चढे चढे भक्तिज्वर अरे तोच रे ईश्वर तोच तोच रे ईश्वर तुझ्या मायेची सावली आम्हा सर्व चरावर देई पर्वत ताकद जशी दुधात साखर स्वामी स्वामी राया तुम्ही तुमच्या पडतो पाया आम्ही देगा आशीर्वाद आम्हा तूच स्वामी सर्व ब्रम्हा उघडा ज्ञान दार सर्वा तुमच्या सर्वार्थ शक्तीने घालू अभिषेक आम्ही आमच्या प्रेमळ भक्तीने बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ,, स्वामी समर्थाना मनोभावे अर्पण {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

(गफ)

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 27/05/2019 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||

लेखक मनो यांनी रविवार, 26/05/2019 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील. या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो.

बायको

लेखक बाप्पू यांनी रविवार, 26/05/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गावाकडे कित्येक मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक मध्यम वर्गीय मुले विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुले चाळीशी ओलांडली तरी अजुन मुलगी न मिळाल्याने अविवाहित आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक गावात नसले तरी ज्या ज्या गावात मी फिरलो त्यापैकी 90% गावात अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काही प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक.. पण दिवसेंदिवस अश्या ह्या "सिंगल" मुलांची संख्या वाढतच चाललीये..

कटका रस्थान की साजिश ?

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 26/05/2019 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी हल्ली पुन्हा मराठी शिकायची जरूर वाटल्याने काय बरें करावे अशा विचारांत आहे. कारण पहा - जर दूरचित्रवाणीवरचे बोलणे आदर्श मानले तर हल्ली कुठेही नुस्ताच कट किंवा नुस्तंच कारस्थान केलं जात नसतं तर जे कांही होत असतं ते double barrel "कटकारस्थान"च केलेलं असतं आणि म्हणतांना "कटका" ("फटका" सारखं) आणि "रस्थान" ("राजस्थान" सारखं) असं दोन शब्दांत म्हणायचं असतं. आणखी एक पर्यायही आहे - "षट्कार" या शब्दांतला "ष" का "शहामृग" या शब्दांतला "श" हे कळेल ना कळेल अशा (की अषा?) बेताने जे घडले त्याला "साजिश" किंवा "षडयंत्र" म्हणून टाकायचे.

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 25/05/2019 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने....... एक शहरात राहणारी, मध्यम वयातील स्त्री; देशात होणाऱ्या सततच्या राजकीय घडामोडींमुळे जिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही तिने २०१९ च्या देशाच्या निवडणुकीत मनापासून मतदान केलं. मोठी लाईन लागलेली होती मतदानासाठी. खूप उकडत होतं; प्रौढ मतदारांना पुढे जाण्याची परवानगी असल्याने असलेल्या रांगेमध्ये देखील अजून वेळ लागत होता... तरीही ही स्त्री उभी होती. 'मी माझा मतदानाचा हक्क.... किंबहुना जवाबदारी जर आज पूर्ण केली नाही आणि असंच एक-एक करत अनेकांनी मत दिलं नाही तर कदाचित काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधी निवडून येईल.... नको रे बाबा!