Skip to main content

माझ्या आठवणीतला तात्या

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/05/2019 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
"आम्ही तात्याला पहिला नाही"अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत. मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो. २००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले "असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद"यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो..... मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली.

खाण्यासाठी जन्म आपुला १ : साई दावणगिरी डोसा

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे जसं जसं वाढत चाललं आहे तसं तसं खाण्याच्या बाबतीत हि ग्लोबल होत जाते आहे. आधी इडली डोसा सारखे दाक्षिणात्य पदार्थ म्हंटल की लोकांच्या तोंडी रुपाली-वैशाली-वाडेश्वर हि नाव यायची, आता अपसाऊथ, सांबार, अण्णाज इडली वगैरे साऊथ इंडियन पदार्थ खाऊ घालण्याच्या नावाखाली चकचकीत रेस्टॉरंट आली. पण या सर्वात एक कमी होती ती म्हणजे या पैकी एकही जण धड चवीचा 'लोणी स्पंज डोसा' देऊ शकत नव्हतं.

शतजन्म शोधितांना....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.

शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान

लेखक Sumant Juvekar यांनी शुक्रवार, 17/05/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपला शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरू दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेले ११४ ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास दादासाहेबांना अडिच महिने लागले. तस्मात् वाचकांनी १५ मिनिटे तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व 9967840005 वर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिनंदन, अभिनंदन! एक मार्च २०१९ रोजी आपला शूर वैमानिक अभिनंदन वर्धमान, शत्रु देशातून स्वदेशी परतला.

लोकशाही ‘शाई’ पुरती!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/05/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारताचे तमाम लोक हे नागरिक नाहीत. फक्त मतदार आहेत. भारताचे लोक स्वत:ला ‘जागरूक नागरिक’ समजतात. आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून मतदान करतात. वीस- पंचवीस उमेदवारांपैकी मतदारांना एकही पसंत नसतो, पण निवड न करता कसं चालेल, म्हणून तो कोणाला तरी मतदान करतो. NOTA पर्यायही स्वीकारतो. (नोटा पर्याय निवडणं म्हणजे बोटाला शाई लावण्यापुरतं मतदान करणं.) इतक्यांपैकी नागरिकांना एकही उमेदवार योग्य वाटू नये, हे खरं तर उमेदवारांनाच लज्जास्पद वाटलं पाहिजे. दिवसेंदिवस नोटावरचं मतदान वाढतंय, याचं चिंतन मतदारांनी नव्हे, तर उमेदवारांनी- पक्षांनी केलं पाहिजे.

माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप

लेखक मार्गी यांनी बुधवार, 15/05/2019 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
१०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

तात्या!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 15/05/2019 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या अभ्यंकर ‘मिसळपाव’ चालवायला लागला आणि कधीतरी मी त्याच्या ‘हाटेला’त जाऊन ‘तात्याची स्पेशल मिसळ’ चाखली. मग मला त्याची एवढी चटक लागली, की मी ‘मिसळपाव’वर अक्षरश: ‘पडीक’ होऊन गेलो. मनात आलं की काही ना काही ‘मसाला’ तिथे ओतू लागलो. चवदार असला तर तात्या स्वत: तारीफ करायचा. जमला नाही तर स्पष्ट तसंही सांगायचा. पण तात्याच्या हातची टेस्ट काही वेगळीच असल्याने, त्याचा तो अधिकार माझ्यासारख्या अनेकांनी मान्य केला होता. तात्याने पालथा घातला नाही असा प्रांत नाही, हे त्याच्या अनुभवी लिखाणातून केव्हाच स्पष्ट झालं होतं. ‘मिसळपाव’ नामांकित करण्यात तात्याच्या या हरहुन्नरी लिखाणाचा मोठा वाटा होता.

प्रियांका शर्मा आणि सर्वोच्च न्यायालयाचा विक्षिप्त निर्णय

लेखक माहितगार यांनी बुधवार, 15/05/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
योगायोग पण कसे येतात. भाषण स्वातंत्र्याप्रती औरंगजेबाच्या असहीष्णूतेमुळे शीरच्छेद झालेल्या सरमद कशानी या १७ व्या शतकातील सदगृहस्थाबद्दल याच आठवड्यात लेख लिहिला. लेखास आलेले काही प्रतिसाद मोठे रोचक होते. काहीजणांना औरंगजेबाची न खोडता येणारी उणिव समोर येते आणि औरंगजेबाच्या जे व्हाईट वॉशींगचे (उदात्तीकरणाचे) प्रयत्न उघडे पडतात ही बाब पोळली.

गुलमोहर मोहरतो तेव्हा

लेखक मनमेघ यांनी मंगळवार, 14/05/2019 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
गुलमोहर मोहरतो तेव्हा सखे तुझे हसणे आठवते उन्हातही मग चंद्र उगवतो माझे असणे-नसणे नुरते छोट्या गोष्टींनाही येथे अस्तित्वाचा प्रश्न बनवतो खोड जुनी ती नकळत माझ्या जितेपणीही क्षणिक मोडते. गुलमोहर मोहरतो तेव्हा...! दोन समांतर विश्वांमधले झालो बघ आपण रहिवासी एक एक केशरी फूल हे दोघांमध्ये पूल बांधते. गुलमोहर मोहरतो तेव्हा...! भेट ठरावी अन् विसरावा मीच खुणेचा तो गुलमोहर फक्त उरावा शोध आपला मनी असेही भलते येते. गुलमोहर मोहरतो तेव्हा...! ~ मनमेघ

रियल रियल

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 14/05/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम.....