‘सटाणा तालुका बागलाण’
- डॉ. सुधीर रा. देवरे
सटाणा हे विंचूर - प्रकाशा महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेलं असून 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 37,716 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील (नाशिकपासून 90 किमी ईशान्य दिशेला) बागलाण तालुका म्हणजेच सटाणा तालुका. सटाणा हे तालुक्याचं गाव. सटाण्यापासून वायव्य दिशेला गुजराथ राज्यातील डांग भागाची सीमा फक्त0 40 किमी अंतरावर आहे. गावाजवळून वायव्य- आग्नेय या दिशेने आरम नावाची लहान नदी वाहते. (म्हणजे पूर्वी वहात होती. आता खूप पाऊस झाला तर पावसाळ्यात तात्पुरती वहाते.) सटाण्यापासून दहा किमी पुढे गिरणा नावाच्या नदीशी आरमचा संगम होतो.
मिसळपाव