यंदाचा पाऊस .
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय !
बराच चिखल मग बरेच उन्ह
मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून
निसरडा कधी , गच्च ओला
क्षणात रस्ता भिजवतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥
गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा ,
तरिही अंगावर आणवून काटा
मोठ्या भावासारखा घाबरतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥
पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर
त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर
स्वतःची शक्ती पाऊस दाखवून
"मीच परमेश्वर" , म्हणतोय
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
काव्यरस
मिसळपाव
गौरी देशपांडे
नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात (टिफीन) देण्यासाठी खास करून झटपट बनवले.
हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे.