सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 3 : पाचगणी ते खेड
16.03.2019
आज तसा रिलॅक्स दिवस.. अशी माझी समजूत होती कारण महाबळेश्वर पर्यंत चढाचे 20 km झाले की पुढले 40 km नुसता आंबेनळीचा घाट उतरायचा होता. एकच गडबड ही होती की दुपारी कशेडी घाटाच्या टॉप वर भ खे काका माझ्यासाठी येऊन थांबणार होते. आणि दुपारचं जेवण त्यांच्यासोबत खेड मध्ये व्हायचं होतं. म्हणजे आज दुपारी सायकल चालवायची नाही हे ठरलेलं बाजूला ठेवायला लागणार होतं.
सकाळी सव्वा सहाला हॉटेलातून बाहेर आलो तेंव्हा हवेत चांगलाच गारवा होता. पक्षांची किलबिल सुरू झाली होती. पण सूर्य अजून उगवला नव्हता. मधेच थांबून ती किलबिल रेकॉर्ड करून घेतली. आणि निघालो.
मिसळपाव