सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 5 : हरिहरेश्वर ते अलिबाग
18.03.2019
आजचा पल्ला या सफरीत सगळ्यात मोठा असणार होता. 110 km. या आधी 81, 105, 99, 98 असे टप्पे करून झालेले होते. रस्त्याची दूरावस्था आणि सतत चे चढ उतार आणि दुसरं म्हणजे सायकल ला हेड/टेललाईट नाहीत म्हणून साडेसहा नन्तर सायकलिंग नाही या मुळे 110 पूर्ण करून अलिबाग मध्ये पोचता येईल की नाही याबाबत साशंक होतो. म्हणून काल रात्री 7 आसपासच काशीदमध्ये 'पेमेंट ऑन आराइवल बेसिस वर' रूम बुक केली होती. त्या नंतर रात्री मोगलीशी फोनवर बोललो. त्याच अलिबागमध्ये घर आहे. मी येतोय एवढ्यासाठी तो लॉन्चमध्ये बाईक टाकून अलिबाग मध्ये येणार होता. 'काशीद अलिबाग अगदी जवळ आहे. मला काही सांगू नको.
मिसळपाव