Skip to main content

टिंग्डि टिडिडिडि

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. . 1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल.

(दाराआडची मुंगी)

लेखक mrcoolguynice यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुंगी दाराआडून बघते आहे कोर्टहॉलच्या बाहेर किती बाहेर? कंपाउंडच्या बाहेर, सिग्नलपार जिथे एक हत्ती शोधतो आहे पुष्पगुच्छ मस्त.... करत असेल का तो ही तिचा विचार? येणार असेल का तो आज कोर्टहॉलमधे कंपाउंडच्या आत, सिग्नलच्या अलीकडे? मुंगीही कोर्टातून बाहेर येऊ शकत नाही... जाईल का ती ही हत्तीचा हात धरून, कंपाउंडच्या पलीकडे? आडोसा घेऊन असलेला चुलत खाप मुंगळा हातातली शास्त्रे लपवत, याची जाणीव नसलेली मुंगी आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते.... पुष्पगुच्छात भान हरवलेला हत्ती मॅरेज रजिस्ट्रारच्या कंपाउंडकडे येतच राहतो... येतच राहतो .....

अनेक प्रश्न आणि काही सोल्युशन्स ! TCGN अर्थात टेक केअर गुड नाईट !

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 05/04/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
… तुम्ही नेटबॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग वापरता ? तुमची मुले व्हॉट्स ॲप किंवा इतर कुठले नेट चॅटिंग करतात ? तुम्ही फेसबुक सारखे सोशल मीडियावर अपडेटस ठेवता ? तुम्ही तुमच्या ई-मेल अकाऊंटचा पासवर्ड किती दिवसांतून बदलता ? यापैकी काहीही करत असाल तर तुमचा अविनाश नक्कीच होऊ शकतो ! बदलत्या टेक्नोलॉजीच्या या जमान्यात तुम्ही स्वत:चं , स्वत:च्या कुटुंबाचं, स्वत:च्या मालमत्तेचं संरक्षण करण्यास समर्थ आहात अशी खात्री आहे तुमची ? बदलत्या सामाजिक कक्षा, संस्कृती आणि लाइफ स्टाईल याचं संपूर्ण भान आपल्याला आहे असा विश्वास आहे तुमचा ?

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 05/04/2019 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही. मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच.

दाराआडचा बाबा

लेखक सोन्या बागलाणकर यांनी शुक्रवार, 05/04/2019 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार जिथे एक मुलगी बसली आहे नटून.... करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार? जाईल का ती ही मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे? बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत, याची जाणीव नसलेली मुलगी आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते.... मुलगी हरवलेला बाबा गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो... बघतच राहतो....

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

रायरेश्वर - दुर्ग संवर्धन

लेखक व्लॉगर पाटील यांनी गुरुवार, 04/04/2019 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे एका नवीन गडाच्या मोहिमेसाठी बाहेर पडलो होतो, आजची माजी मोहीम होती ती "रायरेश्वर". रायरेश्वर हे सह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. या पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.

(दाराआडचा दगड)

लेखक mrcoolguynice यांनी गुरुवार, 04/04/2019 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक दगड दाराआडून बघतो आहे मिपाबाहेर किती बाहेर? वास्तविकतेच्या बाहेर, भावनांच्यावर स्वार जिथे एक कवयत्री बसली आहे स्तब्ध.... करत तरी असेल का तो क्षणभर तिचा विचार ? जात असेल का हो तोही विडंबनाच्या बाहेर, ट्रोलीकतेच्या पलीकडे? का टाळ कुटातून तो बाहेरच येऊ शकत नाही... अशा बेइमान उजेडात मग कवयत्री तिच्या जिंदगाणीचा अनुवाद वात करून पाठवते, अंधारात दगड शांतपणे जागा राहतो.... कारण त्याला आजकाल पाझरायलाच होत नाही, हळूहळू आपण डोकी गहाण ठेवणारा ठोंब्या कसा झालो,हे त्याचं त्याला कळत नाही; विझणारी ती मुलगी मात्र वात नसलेल्या कंदिलाआडून बघत राहते... बघतच राहते....

( दाराआडचा वास )

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 04/04/2019 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
कुबट वास दाराआडुन पडतो आहे बाहेर किती बाहेर? यत्र तत्र सर्वत्र , नाकाच्या आर पार नाकातले केस जळून जात आहेत , जळत आहेत किती वेळ ? पोटातले ढवळतंय, येतेय बाहेर, कोण आहे तिथे आत कुणी तरी एक बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही त्या भयानक वासाचा विचार? जळत असतील का त्याचेही नाकातले केस दरवाज्याबाहेर , दरवाज्याच्या पलीकडे? कुणी उभाही राहू शकत नाही , त्या वासाशिवाय ... मग मी माझे नाक घट्ट दाबून , आलेली कळही दाबून , डोळे आणि डोळ्यात जीव आणि पाणी घेऊन शांतपणे उभा राहतो.... वासाला चैत्र पालवी फुटलेली असते नाक नसलेल्या दाराआडून बहरत राहते... बहरतच राहते....

आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 04/04/2019 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय नक्षत्रांच्या यादीमध्ये पुर्वा व उत्तरा फाल्गुनी नंतर येणारे नक्षत्र म्हणजे हस्त त्यानंतर चित्रा व त्यानंतर आहे स्वाती. लक्षात असुद्या नक्षत्र म्हणजे चंद्राचे घर. २७ नक्षत्रे आपण मानतो व ही २७ नक्षत्रे म्हणजे चंद्राची आकाशातील स्थाननिश्चिती करण्यासाठी योजलेली त्याचे घरे मानली आहेत. वैदिक कालापासुनच या सा-या नक्षत्रांना (हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्रे) विशेष मानले गेले आहे. प्रत्येक नक्षत्र ऋतुमानातील बदलांचे सुचक आहेत. जसे ऋतुमानातील बदल आहेत तसेच, त्याच बदलांवर आधारीत कृषि संस्कृतीशी जोडलेले कृषिचक्र देखील आहेच.