धर्म म्हणजे काय?
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे.
धर्म हा संघटितरीत्या मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व सामाजिक व वितर्कीय कल्पनांचा संग्रह असतो. धर्माचा निसर्गात अस्तित्वात असलेल्या व्यक्ती, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो.
महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.'
धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले.
आकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे
भर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम.
या मध्ये एक रचना येते ती अशी
सागरशुक्तिसंपुटगतं सन्मौक्तिकं जायते !
याचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे.
लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ३
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे)
भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
दिल्लीत अशी वाढती बेबंदशाही पसरत असतांना सैनिकांचा सगळ्यात मोठा जथा बरेलीहून दिल्लीत पोहोचला.
अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
_________________________________/\________________________________
हे सारं स्वान्तःसुखाय आहे. आपल्याला कोणाला काही पटवून द्यायचं नाहीये की कोणाचं काही मत खोडून काढायचं नाही. कोणाला वाटेल हे सारं टनाटनी आहे , कोणाला वाटेल हे अज्ञानमुलक स्वात्मरंजन आहे ! असो , आपला आता कोणताच अभिनिवेश नाही , खरेतर आहेच हे स्वात्मरंजन!
लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग २
(या आधी मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे)
भाग १: http://www.misalpav.com/node/44368#comment-1030023
१८५७ सालाच्या काही काळ आधी दिल्लीच्या भवितव्याबद्दलच्या इंग्रजांच्या काही हालचाली पडद्यामागे सुरू होत्या. कांही वर्षांपासूनच मुघल बादशाहीचा भारतावरचा जो काही पगडा शिल्लक राहिला होता तो देखील कसा कमी होईल किंवा काढूनच टाकता येईल आणि "बहादूरशहानंतर काय" हा विचार इंग्रजांच्या डोक्यांत सुरू झाला होता.
विराट, आयपीएल आणि वर्ल्डकप
क्रिकेट वर्ल्डकप तोंडावर आले असताना आयपीएलला प्राधान्य देऊन ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल बीसीसीआयचे हार्दिक अभिनंदन ! अर्थात कितीतरी धनाढ्यांचे हितसंबंध आयपीएलमध्ये गुंतले असताना वर्ल्डकपसारख्या टुकार स्पर्धेचे शुल्लक कारण देता येत नसते ह्याची मला कल्पना आहे.
तर आयपीएल आता रंगात आलेली आहे. आता आमच्यासारखे पूर्वग्रहदूषित आणि प्रतिगामी लोकं आयपीएल बघत नाहीत त्याचा आयपीएलच्या लोकप्रियतेवर घंटा फरक पडत नाही.
कैरीचे अनेक प्रकार
Submitted by तनमयी on 8 April, 2019 - 17:20
कैरीचा मौसम आला की मी अनेक प्रकारे त्याच्या पाककृती बनवते.
ह्या दिवसात भाज्या मिळत नाहीत किवा चव हीन लागतात ,जेवण जात नाही .
अश्या वेळेला कैरीची चटणी असली कि पोळी संपते डब्यातली.
तर मग आपापल्या रेसिपीज share करा .
माझ्या काही रेसिपीज खालीलप्रमाणे.
१) कैरीचे लोणचे
पाककृती: कैरी बारीक चिरून ठेवावी.
मोहरी डाळ/मोहरी पूड ,मेथी पूड ,जीर पूड,, लाल तिखट ,मीठ गरम तेलात कालवून न जळता हिंग व बडीशोप घालावी
थंड झाल्यावर कैरी टाकावी.
१२ तास झाल्यावर खाण्यास घ्यावी.
अश्वत्थ
अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे..
विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा..
सृष्टीतून जीवनरस शोषून घेत,
ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे..
प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून
मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत..
तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात
गाणी गात पानांना ऐकवतात..
जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने
जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात..
लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दरार में ,,,,,,,, भाग १
१८५७ साली हिंदुस्थानांत इंग्रजांच्या विरुद्ध घडलेल्या घटनांना नक्की काय नांव द्यावे याबद्दलची मतें त्यानंतर १०० वर्षे तरी पक्की होऊ शकली नव्हती. हिंदुस्थानचे त्याकाळातले सर्वेसर्वा "कंपनी सरकार" किंवा "कंपनी बहादूर" आणि नंतरचे "राजे" असलेल्या इंग्रजाना ते अर्थातच हिंदुस्थान शिपायांचे बंड वाटत राहिले. जरी त्यानंतर बऱ्याच स्वातंत्र्यवीरांना ते वर्ष "स्वातंत्र्यसमराची सुरवात" असे वाटले तरी बराच काळ स्वतंत्र भारतांतील शासकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांत १९४७ नंतर सुद्धा - इंग्रजांनी घालून दिलेल्या आराखड्याना अनुसरून- १८५७ मध्ये भारतांत घडलेल्या घटनांचा उल्लेख अंमळ संदिग्ध आणि संक्षिप्तच राहिला.
मिसळपाव