Skip to main content

चान्स मिळाला रे मिळाला की अ‍ॅक्टिंग!

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 17/04/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात. एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटासाठी अमुक रविवारी अमुक कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होणार असल्याची बातमी आली. त्या रविवारी मी कॉलेजच्या कामासाठी पुण्याच्या बाहेर असणार असल्यामुळे मी त्यांना फोन करून माझी ऑडिशन आधी घेण्याची विनंती केली.

फ्रान्सिस्को डे गोया

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 17/04/2019 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणुन बंगाल सरकारला झापले ! इतर कोणत्याही केस मध्ये " असहिष्णुता" सिध्द झाली नाही म्हणणार्‍या कोर्टाने ह्या केस मध्ये मात्र दीदींच्या सरकारला तब्बल २० लाख रुपायाचा दंड ठोठावला ! https://thewire.in/law/supreme-court-west-bengal-film-bhobishyoter-bhoot वरील माहीती देण्यात आचारसंहितेचा भंग होत नाही कारण आहे ही वस्तुस्थिती आहे !

क्युट नॅनो !!!

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 16/04/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कार जेव्हढी लहान तेवढी तिची चर्चा जास्त मोठी ! काही वर्षांपुर्वी टाटांनी नॅनो बाजारात आणली होती तेव्हा तिच्यावर टीका करणारा आणि तिच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग होता. एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे देशाने उत्सुकतेने पहात होता. आता नॅनोचे उत्पादन थांबविले गेले आहे पण तेव्हाच माझ्या मनात विचार आला की टाटांनी नॅनोला कार म्हणून विकण्यापेक्षा रिक्षा म्हणून विकले असते तर ?? असो. तर हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे बजाज ऑटो एक नवीन गाडी घेऊन येत आहे "बजाज क्युट" ! बहुधा नॅनोच्या अपयशापासून बोध घेत आताच त्यांनी स्पष्ट सांगीतले आहे की ही कार नाहीये. ही आहे "क्वाड्रासायकल".

सांज

लेखक प्रणया यांनी मंगळवार, 16/04/2019 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
सहज असे चालतांना भेट ती फुलांची,तू मला दिलेली ओंजळीत त्या प्राजक्ताचा गंध राहुनी गेला... हात नाही हातात माझ्या पण तूझा स्पर्श राहुनी गेला.... ना किनारा फेसाळणारा ना लाट एकसारखी झेपावणारी, अस्पष्ट जाहले होते सारे नव्हतीच जणू उरली क्षणे पुन्हा एकदा स्मरणारी.... असे घाबरे मन झाले शहारे सरसरुन आले बोटांमध्ये रुतलेली बोटे तूझी, अचानक तेव्हा घट्ट होती झाली... वेड कोणते भोवती होते की हवेत नशा वाहू लागली, आसुसलेली पहाट होती की अस्तास जानारी रविकिरणे गुलाली..... न उमगले मला क्षणात काय झाले तेव्हा, तू असताना समोर तिथे लाजलेली नजर माझी शोधत होती फक्त तूझी सावली.... सरलीच सांज ती अबोली येणारी रात्र

तू हमाल माझा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 16/04/2019 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
तू हमाल माझा शांत , नेभळट , गरीब, बिचारा (?) तुझी मारण्या , तुज मागे धावणारी चंडिका , महामाया , तुझी कडक लक्ष्मी .... येऊन कामावर तुझ्या चोरून दुरून पाहावे पकडावे रंगेहाथ तुजला कि लाजावी मजसमोर बॉन्डपत्नी ... =============================== तुझी आणि फक्त तुझीच सातजन्म मारणारी चि सौ का ?

श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 16/04/2019 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांपुर्वी व्हॉट्सप्प वर एम मीम आलेला. असे काही डेरिव्हेटीव्ह्स, इन्टिग्रल्स, पार्शियल डिफरन्शियल एक्वेशन चे चित्र होते आणि खाली मेसेज होता की - "कॉलेज संपुन १० वर्षे होत आली पण अजुनही ह्याचा उपयोग काय ते कळलेले नाहीये ख्यॅ ख्यॅ ख्यॅ " वगैरे वगैरे. मी म्हणालेलो " तुम्हाला उपयोग करता येत नाही ह्याचा अर्थ उपयोगच नाही असा होत नाही" त्यावरुन मोठ्ठा वाद झाला ग्रुपवर . . तेव्हा एक मित्र म्हणालेला- " अरे तू इतके सीरीयसली का घेतोस? विनोद विनोद म्हणुन का घेऊ शकत नाही ? " तेव्हा त्या मित्राला म्हणालो - " कारण त्यात विनोद असा काही नाहीये, त्यात केवळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे.

ड्युएल

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 16/04/2019 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली कलाकृती कोणती? तर जिचा आस्वाद घेणे, अनुभव घेणे संपले तरी डोक्यात सुरू राहते ती! अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे. या व्याख्येला पुरेपूर उतरणारा एक सिनेमा मला कसा भावला हे मांडायचा आज प्रयत्न करणार आहे. सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम. यात माणसांनी कमी आणि कॅमेराने जास्त बोलले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. संवादाचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणणे मांडायचा आणि दुसरा म्हणजे स्पष्ट मांडणी न करता खाणाखुणा सांगण्याचा. समोरच्याला विचार करायला भाग पाडण्याचा. यात काही गोष्टी मांडणे जाणीवपूर्वक टाळावे लागते. पण यात तोल सांभाळावा लागतो तो अति अवघड!

गडगडत्या बाजारातील संधी

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/04/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोक हो माझ्या "दर महा ८% ते १०% परतावा शक्य आहे का?" या धाग्यावर भवति न भवति होऊन बरीच धूळ उडाली. त्यात एक मत पुन:पुन: व्यक्त केले गेले ते असे की फक्त चढत्या बाजारात असा परतावा मिळु शकेल. गडगडत्या बाजारात असा परतावा मिळणे शक्य नाही, इ० या प्रश्नाचा पुरता छडा लावण्यासाठी अलिकडेच २०१८ मध्ये म्ह० २८ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये बाजार गडगडलेला असताना काय चित्र दिसते याचा तपास करायचा ठरवले. या अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.

तू चांदणी माझी

लेखक चामुंडराय यांनी मंगळवार, 16/04/2019 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - चंद्राची चांदणी - ओळखा पाहू तू चांदणी माझी शांत, सोज्वळ, साजिरी तुज चुम्बण्या तुज मागे धावणारा उठवळ अश्व मी .... घेऊन कवेत तुला निखळ उब अंगी भरावी प्रणय करावा मी एव्हढा की लाजावी मजसमोरची चांदणी ....

असे असावे

लेखक अन्या बुद्धे यांनी सोमवार, 15/04/2019 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
असतो दगड तर कदाचित जमले असते कोरडे राहणे हिरव्या पावसात देखील आतून रुजून न उमलणे निळ्या नभात ढग व्हावे अमृताने पूर्ण भरलेला द्यावे आणिक निघून जावे इतकेच ठाऊक असलेला बासरीतून संगीत जन्मते रसिक मनांना भिजविते श्वास थांबता फुंकलेला पोकळ रिक्त शांत उरते फक्त असावे या जगती नसो अभिलाषा जगताना सहजस्फुर्त अस्तित्व असावे भार नसावा श्वासांना -अनुप