वाटणी
रामू आणि शेवंताला आजची रात्र सरत नव्हती. म्हातार्याच्या दहाव्या बरोबरच पै पाहुण्यांमध्ये अर्जुनाचे लग्न आणि वाटणीचा विषय छेडला गेला होता त्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते.
दहा एकर बागायती शेतीत सोन पिकत होतं त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे नवरा बायको सुखी होते त्यात वंशवेल वाढुन आनंदात भरच पडली होती धाकटा अर्जुन शेवंताच्या डोळ्यात खुपत होता त्याचा हिस्सा कुठेच असू नये असं तिला मनोमन वाटत होतं. म्हाताऱ्याचा अर्जुनवर असणारा जीव पुऱ्या गावाला माहीत होता.
मिसळपाव