Skip to main content

[शशक' १९] - वेंधळा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 13/02/2019 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी वेंधळेपणा करतो म्हणे! एखाद्या वेळेस चावी किंवा ग्रोसरी गाडीत राहिली म्हणुन लगेच? त्याने आठवणीने गाडी रिवर्स लावली, वायपर्स उभे करुन ठेवले. शॉवेल आणि ब्रश ट्रंकमधुन घेताना त्याला मागच्या वेळची फजिती आठवली. दोन फुट बर्फ आणि हत्यारं सगळी गाडीच्या ट्रंकेत! रात्रभरात गुडघ्याइतका बर्फ पडला होता. अर्धा तास आधीच उठुन समीर खाली गेला. गाडी स्टार्ट करुन ठेवावी का? एक्झॉस्ट बर्फात ब्लॉक्ड असेल. मागे एकाच्या गाडीत कार्बनमोनॉक्साइड पसरुन गुदमरुन गेला.

दिवस तुझे ते ऐकायचे....

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 13/02/2019 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 12/02/2019 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कवी संजीव यांची क्षमा मागून मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ || माया माहेराची बोफोर्स दलालीची... 'इकडून' घातली भर पाचशे कोटींची... गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ || येता निवडणूक साडी नेसावी... आई - भावासाठी मते मागावी... चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया... विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे... वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ || - यतिन भट

[शशक' १९] - लोणचं

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांनी डबे उघडले आणि त्यातले जिन्नस चवीपुरते वाटून घेतले. त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या. मित्र म्हणाला, ‘लोणच्यानं मजा आणली! उद्याही घेऊन येना थोडं.’ त्याचा घास घश्यातच अडकला. भरून आलेले डोळे कुणाला न दिसेलसे पुसत म्हणाला, ‘माफ करा मित्रहो! हे लोणचं मी पुन्हा कधीही आणू शकणार नाही.’ दोन आठवड्यांपूर्वी एके सकाळी त्याची आई कार्डिअॅक अॅरेस्टने गेली. भावाघरी धावला तो, पण कुणालाच काही करता आलं नाही. सगळं आटोपल्यावर घर सोडताना, जाण्यापूर्वी चारच दिवस आईने घातलेलं लोणचं प्रत्येकाने छोट्या बरणीतून आठवण म्हणून घेतलं. ते कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं.

[शशक' १९] - गैरसमज

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच...." तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो कडाडला. "काय मी मी लावलंय सारखं.मी हे केलं मी ते केलं. मला जसं जमतय तसं मी करतोय. कधी कसलीच तक्रार करत नाही तुझ्याकडे. तु म्हणालीस म्हणुन चाललोय ना मुलीच्या शाळेत मिटींगला. ऑफिस मद्धे कामाचे डोंगर पडलेत त्याचं आधीच टेन्शन आलंय तरी काही बोललो का ? उतर ईथेच" असं म्हणून त्याने कारचा दरवाजा उघडुन तिला खाली उतरवलं. "प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच सॉरी म्हणायचं. चुक कोणाचीही असो" तिने मनातल्या मनात मघाचे वाक्य पूर्ण केले.आता त्याचा राग कसा घालवायचा असा विचार करत, तिच्या कामांचा ढीग पूर्ण करायला ती ऑफिसमद्धे निघाली.

[शशक' १९] - तिकीट

लेखक चिनार यांनी मंगळवार, 12/02/2019 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो..प्रदेशाध्यक्ष साहेब..तात्याराव बोलतो" "हा बोला.." "आमच्या तिकीटाचं सांगणार व्हते तुमी?" "तिकीट कन्फर्म आहे तुमचं ह्यावेळी..खोके पाठवा आन तयारीला लागा निवडणुकीच्या" "बरं...करतो व्यवस्था.." काही दिवसांनी.. "प्रदेशाध्यक्ष..गेम खेळू नका आमच्यासोबत..आप्पासाहेबाकडून पन खोके मागवल्याची खबर लागली आम्हाला" "विश्वास नाही का आमच्या शब्दावर?

[शशक' १९] - भेट

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
दरवाजा उघडला. तर हा! समोर गुलाबासकट गुलाबाची कुंडी घेऊन... (हम्मम... मवाली कुठला...) (तेवढ्यात बाबांचा प्रश्र्न..) कोण आहे गं? मी चाचपडत... गोंधळलेल्या अवस्थेत काही बोलणार तोच. बाबा बोलले "रोपटे घेऊन आलाय... हा ये रे! तिकडे गॅलरीत ठेव..." त्यानेच दिलेल्या कुंडीतलं गुलाब त्याच्या उशाशी ठेवून मी निघाले... निघण्यासाठी दरवाजा उडण्या आधी पुन्हा एकवेळ वळुन त्याच्याकडे पाहीलं. तो एकटक माझ्याकडे पाहत होता. आजुबाजुला स्तंब्धता, शांतता आणि व्हेन्टीलेटरचा भीतीदायक आवाज. माझे डोळे बांध फुटावा असे वाहत होते... मी दार उघडला आणि मेंहदी भरलेल्या पावलांनी धावत सुटले...

[लाज] - श श वि

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/02/2019 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात विज्जुभाउंची ही कथा दिवसभर मंत्रालया बाहेर बंदोबस्तासाठी उभे राहून वैतागलेला राणे हवालदाराचा घरी जाताना थोडीशी टाकून जाणे हा दिनक्रम होता. आजची रात्र काही वेगळीच होती. बेस्टच्या बसने सोडलेला धुर रस्त्यावर पसरला होता. त्यातून नाकासमोर हात हलवता चालताना राणेसाहेब ओसांडून वहाणाऱ्या कचराकुंडीपाशी जरासे रेंगाळले. कुंडीच्या मागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राणेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". कुंडीमागे कोणीतरी होते. त्यांनी काठीने जरासे ढोसले आणि दचकून जोरात “हाड” असे ओरडले.

लाज - स्पर्धेबाहेरची श श क

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 12/02/2019 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभराच्या दगदगी नंतर राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा. आजची धुंद रात्र काही वेगळीच होती. हवेत रातराणीचा मदमत्त गंध पसरला होता. चालता चालता राजेसाहेब फुललेल्या रातराणीच्या जाळीजवळ जरासे रेंगाळले. कोपर्‍यावरच्या झुडूपामागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राजेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". झुडूपामागच्या बाकड्यावर एका युगूल दिसले. चेहरे ओळखीचे वाटले. प्रधानजी आणि राणीसाहेब. क्षणभर तिघेही दचकले. राणीसाहेबानी चेहेर्‍यावर घुंगट ओढून घेतला. अंधारात काहीच दिसले नाही अशा आविर्भावात राजेसाहेब तेथून दूर गेले.

[शशक' १९] - गलका

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
तो आज चालतच निघाला. ऑफिस आगदीच हाकेच्या अंतरावर नसलं तरी वेळेत निघालं तर बॉसच्या शिव्या खायच्या आत पोहोचण्या एवढ्या अंतरावर होतं. दोन चौक ओलांडून पुढच्या वळणावर तो वळला. शेजारच्या वेड्यांच्या इस्पितळाच्या दहा फुटी लाकडी कुंपणा पलीकडून एकाच गलका झाला. ‘’१२..१२..१२............’’ तसा तो रोज या रस्त्याने येत नसला तरी जेव्हा या रस्त्याने जायचा तेव्हा नेहमीच असे वेगवेगळ्या आकड्यांचे कोरस त्याच्या कानी यायचे. नाही म्हटलं तरी आज मात्र त्याचं कुतूहल चाळवलंच.