अरे संसार संसार...
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तव्हा मिळते भाकर
बहिणाबाईंची ही शाळेत शिकलेली कविता. आज आठवण यायचं कारण काय? तर झालं असं की आज कित्येक दिवसांनी एकावेळी बऱ्याच भाकरी केल्या. त्या करत असताना मला माझा भाकरी करायला कशी शिकले तो प्रवास आठवला.
माझ्या माहेरी सकाळी पोळ्या आणि रात्रीच्या जेवणात भाकरी अशी सवय आहे. सकाळचं संध्याकाळी अजिबात चालायचं नाही. अर्थातच हे सर्व काम आईच करत असे. परंतु आईला स्पॉन्डिलायटिसचा खूप त्रास सुरु झाल्यावर पोळ्या करण्यासाठी बाई कामावर ठेवल्या. पण संध्याकाळी आईला ताज्या भाकरी कराव्याच लागत.
मिसळपाव