नारळीकर आणि अत्रे - त्यांच्याच पुस्तकातून...
मागच्या दोन-तीन महिन्यात दोन चांगली मराठी पुस्तके वाचली. अतिशय आवडली. दोन अतिशय प्रतिभावंत मराठी दिग्गजांची ही पुस्तके वाचून मी खूप प्रभावित झालो. काही ठळक बाबी या ठिकाणी मांडाव्यात म्हणून लिहायला बसलो.
चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
हे पुस्तक मी दुसर्यांदा वाचले. जयंत नारळीकर हा किती अफाट माणूस आहे हे या पुस्तकातून कळते. या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बनारस, केंब्रिज, मुंबई, आणि पुणे या चार शहरांमध्ये व्यतीत केलेला काळ उभा केलेला आहे. नारळीकरांचे वडील आणि दोन मामा रँग्लर होते.
मिसळपाव
